spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

India vs New Zealand T-20: मध्ये सूर्यकुमार यादवची उत्कृष्ट कामगिरी कायम

सूर्यकुमार यादवची टी-२० मधील उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या T२० (IND vs NZ) मध्ये उत्कृष्ट शतक झळकावत भारताला १९१ धावनपर्यंत नेण्यासाठी मोठी कामगिरी केली आहे. तसेच सूर्यकुमारच्या २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ११०० धावा पूर्ण झाल्या आहेत. जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला १००० धावाही पूर्ण करता आल्या नाहीत. सूर्याने ४९ चेंडूत शतक पूर्ण केले. २०२२च्या आंतरराष्ट्रीय टी-२०मधील हे त्याचे दुसरे शतक आहे. अशा प्रकारे त्याने रोहित शर्माची मोठी कामगिरी केलीविक्रमाची बरोबरी केली.

२०१८ ला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये, रोहित शर्माने T२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात दोन शतके झळकावली. याआधी टी-२० वर्ल्ड कपमध्येही त्याने चांगली कामगिरी करताना २००हून अधिक धावा केल्या होत्या. टी-२० विश्वचषक २०२२ बारात विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात प्रथम खेळताना टीम इंडियाने ६ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने ५१ चेंडूत १११ धावा करून नाबाद राहिला. ११ चौकार आणि ७ षटकार मारले. तसेच सूर्यकुमार यादवने यापूर्वी २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारत या सामन्यात ११७ धावांची शानदार खेळी केली होती. भारतीय संघाला हा सामना जिंकता आला नाही. ३ सामन्यांच्या सिरीजमध्ये पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. अशा स्थितीत हा सामना जिंकणारा संघ सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेईल आणि मालिका गमावण्याचा धोकाही टळेल.

जर आपण ३२ वर्षीय सूर्यकुमार यादवच्या २०२२ च्या T२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील कामगिरीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत ३० सामन्यांच्या ३० डावांमध्ये त्याने ११५१ धावा केल्या आहेत. त्याने २ शतके आणि ९ अर्धशतके केली आहेत. म्हणजेच त्याने ११ वेळा ५० पेक्षा जास्त धावांची इनिंग खेळली आहे. स्ट्राइक रेट १८८ आहे. सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ४१ सामन्यांच्या १३९५ धावा केल्या आहेत.

अमोल पालेकर पत्नी संध्या गोखलेसह भारत जोडो यात्रेत सहभागी; फोटो आले समोर

T२० च्या दुसऱ्या सामन्यात भारतिय संघाची धुवादार सुरुवात

Latest Posts

Don't Miss