spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rohit Sharma Team India : रोहित शर्माने ११ वर्षांपूर्वीच केली होती ‘ही’ मोठी भविष्यवाणी, ट्विट व्हायरल

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून खेळणार नाही. २०२२ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्याला विश्रांती देण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिका सुरू असताना रोहित शर्माचे एक ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. त्यांनी ११ वर्षांपूर्वी एक मोठी भविष्यवाणी केली होती जी आता खरी होताना दिसत आहे. हे व्हायरल ट्विट पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

या ट्विटमध्ये रोहितने सुर्यकुमारची स्तुती केली आहे. चेन्नईमध्ये बीसीसीआय पुरस्कार सोहळा पार पडला. भविष्यात काही मनोरंजक क्रिकेटपटू असणार आहेत. मुंबईचा सूर्यकुमार यादव हा भविष्यात पाहण्यासारखा खेळाडू असेल. आता चाहते रोहितचं ट्विट रिट्विट करून त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

सूर्यकुमार यादवने मार्च २०२१ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण सामना खेळला. त्याला टीम इंडियामध्ये अजून २ वर्षेही पूर्ण झालेली नाहीत, पण त्याने टीममध्ये आपली जागा पक्की केली आहे. नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात त्याने कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. या सामन्यात त्याने ५१ चेंडूत १११ धावांची नाबाद खेळी केली. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवने या वर्षात आपली दोन्ही टी-२० शतके झळकावली आहेत. यापूर्वी केवळ रोहित शर्माने १ वर्षात१ टी-२० शतके झळकावली होती.

World Television Day 2022 : आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे तुम्हाला ठाऊक आहे का ?

सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी आतापर्यंत १३ वनडे आणि ४१ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये, सूर्यकुमार यादवने ३४.० च्या सरासरीने३४० धावा केल्या आहेत, ज्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, टी-२० सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत ४५.० च्या सरासरीने १३९५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १८१.६४ च्या स्ट्राईक रेटने १२ अर्धशतके झळकावली आहेत. २०२२ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू होता.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर मुंबईतील सर्वपक्षीय सदस्यांची बैठक

Latest Posts

Don't Miss