spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

भूकंपाच्या धक्क्यांनी इंडोनेशिया हादरलं, मृतांचा आकडा ४० वर

इंडोनेशियाचं जावा बेट भूकंपाच्या धक्क्यानं हादरलं आहे. अनेक इमारती कोसळल्याची माहिती मिळते आहे. या भूकंपात ४० जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती प्रशासनानं व्यक्त केलीय. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार, ५.६ रिश्टर स्केलचे हे भूकंपाचे धक्का होते. पश्चिम जावा प्रांतातील सियांजुर प्रदेशात हे धक्के बसले. या भूकंपाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात या भूकंपाची भयानकता दिसतेय.

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिकांनी भयभीत झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी भूकंप झाला. भारतातही गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे धक्का जाणवत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी येथे बुधवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता ४.१ मोजली गेली होती. अरुणाचल प्रदेशात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी ९.५५ च्या सुमारास हे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.७ इतकी होती. सियांजुर हॉस्पिटलमध्ये जवळपास ३०० जणांवर उपचार सुरू आहेत, असं हर्मन सुहेरमन या शासकीय अधिकाऱ्याने मेट्रो टीव्ही या स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. ज्या इमारती कोसळल्या आहेत, तिथून रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करणारी पथकं प्रयत्न करत आहेत. “मी काम करत होते, तेव्हा इमारत हलल्यासारखी वाटली. भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवत होते. हे नक्की काय होतं, हेच कळत नव्हतं. हे धक्के काही वेळ तसेच सुरू होते,” असं वकील असलेल्या मायादिता वलुयो यांनी एएफपीशी बोलताना सांगितलं.

जपानमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. भूकंपाचे धक्के जाणवल्यानं लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, घरांतील वस्तूही खाली पडल्या होत्या. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हे ही वाचा : 

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

सीमाभागातील बंद झालेल्या सुविधा नागरिकांसाठी पुन्हा सुरु करणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss