spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम ‘मुनमुन दत्ता’चा जर्मनीत अपघात, जाणून घ्या तिच्या प्रकृती विषयी अपडेट

कौटुंबिक कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा सर्वांचा आवडता कार्यक्रम आहे. शोमध्ये दिसणारी गोकुळधाम सोसायटी आणि त्यात राहणारी पात्रे चाहत्यांना खूप आवडतात. बबिता जी त्यापैकीच एक. अभिनेत्री मुनमुन दत्ता बबिता जीची भूमिका साकारत आहे. आजकाल मुनमुन जर्मनीत निवांत फिरताना करत आहे. दरम्यान, तिच्या अपघाताची माहिती समोर आली.

हेही वाचा : 

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

मुनमुन दत्ताचा जर्मनीत किरकोळ अपघात झाला आहे. तिने स्वतः इंस्टाग्रामवर ही बातमी चाहत्यांना दिली आहे. ट्रॅव्हल प्रेमी मुनमुन दत्ताने एक आठवड्यापूर्वी तिची युरोप ट्रीप सुरू केली होती. तिने नुकतेच स्वित्झर्लंड आणि जर्मनीला भेट दिली आहे. पण दुर्दैवाने अभिनेत्रीला जर्मनीमध्ये अपघात झाला. मुनमुनने पोस्ट मध्ये म्हटले, “जर्मनीमध्ये एक छोटासा अपघात झाला. माझ्या डाव्या गुडघ्याला खूप दुखापत झाली आहे. त्यामुळे मला माझा प्रवास अर्धवट सोडून घरी परतावे लागले.” यासोबतच अभिनेत्रीने ब्रोकन हार्टचा एक इमोजीही शेअर केला आहे. यावरूनच या अभिनेत्रीला तिची ट्रीप मध्येच सोडल्याचे किती वाईट वाटत आहे, हे स्पष्ट होते.

Bigg Boss Marathi 4 : स्पर्धक किरण माने घराबाहेर होताच विकासनं बदलला गेम?, प्रोमो रिलीज

मुनमुन दत्ता गेले अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कॉमेडी शोचा भाग आहे. तिची बबिता जी आणि अभिनेता दिलीप जोशीची भूमिका जेठालाल यांच्यातील मजा चाहत्यांना आवडते. बबिता जी जेठालालच्या एकतर्फी प्रेमाबद्दल अनभिज्ञ आहे आणि यामुळे ती वेडीवाकडी गोष्टी करायला भाग पाडते, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक शेअर करत असते. जे पाहण्यात प्रेक्षकांना मजा येते.

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

Latest Posts

Don't Miss