spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘२ महिन्यात शिंदे- भाजप सरकार पडणार’, दानवेंच्या दाव्याला संजय राऊतांच्या दुजोरा

शिंदे-भाजप सरकार पडणार, लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील कित्येक नेत्यांनी अनेकदा असे भाकीत केलं आहे. मात्र खुद्द भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यातील स्थिती गोंधळलेली असल्याचं म्हटलं. त्यामुळे रावसाहेब दानवे कधी कधी खरंही बोलून जातात. हे मध्यावधीचे संकेत समजावेत. शिंदे-भाजप सरकार १०० टक्के पडणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय.

हेही वाचा : 

श्रद्धा हत्याकांड प्रकरणी आफताबची कोर्टासमोर मोठी कबुली म्हणाला, हत्येनंतर मृतदेहाचे ३५ तुकडे दररोज एक एक करून…

काय म्हणाले होते दानवे?

काल कन्नड येथील सभेत रावसाहेब दानवे म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही.’ रावसाहेब दानवेंच्या याच वक्त्यावरुन खासदार संजय राऊतांनी शिंदे सरकारला टोला लगावला आहे.

त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलून दाखवतात. दोन महिन्यानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं म्हणजेच त्यांनी मध्यवधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार १०० टक्के पडतंय, याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

मुंबईत गोवरचा उद्रेक, आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू, नाशिकमध्ये रुग्ण आढळले

संजय राऊत दिल्लीत

संजय राऊत यांनी म्हटले की, राज्याचे मुख्यमंत्री बेळगाव सीमा प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घेणार असल्याचे समजते. या बैठकीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याची मागणी राऊत यांनी केली. या बैठकीच्या व्हिडिओ चित्रीकरणातून पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली, याची माहिती महाराष्ट्रातील आणि बेळगावमधील जनतेला समजेल असे त्यांनी म्हटले. आमचं कानडी बांधवांशी, कर्नाटक राज्यासोबत भांडण नाही. मात्र, हा मराठी भाषिकांवरील अन्यायाचा प्रश्न असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. बेळगावातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात राज्य सरकारने आवश्यक पावले उचलावीत असे आवाहन राऊत यांनी केली.

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा बचाव करणारे सीमावासियांना काय न्याय देणार? राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Latest Posts

Don't Miss