spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs NZ : टीम इंडियाने मालिका १-० ने जिंकली

भारत विरुद्ध न्यूझीलंड ही तीन सामन्यांची टी-२० मालिका न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली खेळवली जात होती. या मालिकेमुळे टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. म्हणजे भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची ही टी-२० मालिका १-० अशा फरकाने जिंकली. या टी-२० मालिकेतील तिन्ही सामन्यात आपली उपस्थिती दर्शवली आहे.

संपूर्ण सामन्याचा विचार करता नाणेफेक (Toss Update) जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने (Team India) भेदक गोलंदाजीने सुरुवात करत न्यूझीलंडचे दोन फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण त्यानंतर क्रिजवर आलेल्या डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्सनं संयमी तसंच फटकेबाजीने सुरुवात करत संघाचा डाव सावरला. दोघांनी संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. दोघांनीही अर्धशतकं ठोकली असून डेवॉन कॉन्वेने ५९ आणि ग्लेन फिलिप्सनं ५४ धावा केल्या. त्यानंतरचे फलंदाज मात्र अगदी पटापट बाद होत गेले. नीशाम, मिल्ने आणि ईश सोधी हेतर शून्यावर बाद झाले. भारताच्या अर्शदीप सिंहनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. सिराजनंही ४ विकेट्स घेतल्या. तर हर्षल पटेलनही एक विकेट घेतली.

१६१ धावांचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. ईशान किशन १०, ऋषभ पंत ११ आणि सूर्यकुमार १३ धावा करुन तंबूत परतले. श्रेयस अय्यरतर खातंही खोलू शकला नाही. मग कर्णधार हार्दिकनं काहीशी फटकेबाजी करत १८ चेंडूत नाबाद ३० धावा केल्या, दीपक हुडानंही नाबाद ९ धावा केल्या, ज्यामुळे ९ ओव्हरमध्ये भारतानं ७५ रन केले. ज्यानंतर पाऊस आला आणि सामना थांबवला, अखेर काही वेळानंतर डीएलएस मेथडनं निकल काढण्यात आला आणि सामना बरोबरीत सुटला. पण मालिकेतील दुसरा सामना भारतानं जिंकला होता, तर पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला असल्याने अखेर मालिका भारताने १-० ने जिंकली आहे.

हे ही वाचा : 

शेतक-यांना पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देणार: नाना पटोले

प्रेक्षकांच्या मनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी बॉलीवूडमध्ये कार्तिक आर्यन सर्वोच्च स्थानावर; पहा काय आहे कारण

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss