spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रवींद्र जडेजाच्या कुटुंबातील ‘राजकीय लढा’ चर्चेत; सहानुभूतीसाठी निवडणुकीच्या प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याचा आरोप

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Election 2022) मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय. अशा स्थितीत स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांच्या बाजूने आरोप-प्रत्यारोप तीव्र स्वरुपात होताना दिसत आहे. गुजरातमध्ये भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची बहीण तथा काँग्रेसच्या उमेदवार नयनाबा यांनी त्यांची वहिनी भाजप उमेदवार रिवाबा जाडेजा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नयना यांनी मंगळवारी सांगितले की, आगामी निवडणुकीच्या प्रचारासाठी लहान मुलांचा वापर केल्याप्रकरणी रिवाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा : 

सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी सीबाआयने मोठा खुलासा

पत्रकारांशी बोलताना नयनाबा म्हणाल्या की, रिवाबा सहानुभूती मिळवण्यासाठी मुलांचा वापर करत आहे. त्यामुळे हा बालमजुरीचा जघन्य गुन्हा मानला जाईल. याप्रकरणी काँग्रेसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे नयनाबा यांनी सांगितले. राजकोट पश्चिमचा मतदार विभाग असूनही रिवाबा जामनगर उत्तरमध्ये कशी मते मागू शकतात, असा सवाल काँग्रेस नेत्याने केला.

Happy Birthday Amruta Khanvilkar : ‘चंद्रा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता खानविलकरसाठी आज खास दिवस

जामनगर उत्तर जागेवर रवींद्र जडेजाच्या कुटुंबातील दोन सदस्य (त्यांची पत्नी आणि त्यांची बहीण) आमनेसामने असल्याने निवडणूक चुरशीची होऊ शकते. रिवाबा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत, तर त्यांची बहीण जामनगर उत्तरमध्ये विरोधी काँग्रेसचा प्रचार करत आहे आपल्या विजयाचा दावा करताना, नयनाबा म्हणाल्या की रिवाबा जडेजाच्या जिंकण्याची शक्यता कमी आहे, कारण ती एक सेलिब्रिटी आहे आणि जामनगरच्या लोकांना त्यांच्यासाठी काम करणारा स्थानिक नेता हवा आहे.

Sanjay Raut : साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र कुरतडण्याचं काम सुरु…संजय राऊतांचा हल्लाबोल

Latest Posts

Don't Miss