spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी HIVग्रस्त गर्भवतीवर उपचारास दिरंगाई केल्याने नवजात बालकाचा मृत्यू

फिरोजाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निष्काळजीपणामुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका गर्भवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गर्भवती महिलेचा अहवाल पाहिल्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ती HIV पॉझिटिव्ह असल्याने प्रसूतीला उशीर केल्याचा आरोप आहे. दरम्यान, निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा तत्काळ मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : 

Margashirsha Laxmi Pooja 2022 : महिलांनो मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करताय ? मग आता एक क्लिकवर व्हा प्रसिद्ध

महिलेच्या कुटुंबीयांनी चक्क सहा तास उपचार झाले नसल्याचा आरोप केला आहे. यामुळे प्रसूतीला उशीर झाला. त्यानंतर मुलाचा जन्म झाला. मुलाची प्रकृती नाजूक होती आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, कोणीही बोलण्यास तयार नव्हतं. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल संगीता अनेजा यांनी मंगळवारी महिला व बाल रुग्णालयाची पाहणी केली. ज्यांनी निष्काळजीपणा केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.

या महिलेचे वडील गीतम सिंह यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी आपल्या मुलीला एका खाजगी रुग्णालयात नेले होते. काही वेळात प्रसूती होईल, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी तुम्हाला २०-२५ हजार रुपये लागतील. खर्चामुळे मुलीला सरकारी दवाखान्यात आणले. दुपारी तीन वाजता त्यांनी मुलीला आणले, मात्र रात्री आठ वाजेपर्यंत तिला कोणी हात लावला नाही, औषधही दिले नाही. वेदनेने ती हैराण झाली होती. रात्री प्रसूती झाली तेव्हा बाळ गंभीर असून त्याला मशीनमध्ये ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. सकाळी मुलाचा मृत्यू झाल्याचा फोन आला.

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचे नुकसान केल्या मुळे अमृता धोंगडेला सुनावली ही शिक्षा

स्वयंसेवी संस्थेच्या क्षेत्र अधिकाऱ्याने महत्त्वाची माहिती दिली

एका एनजीओच्या एचआयव्ही विभागाच्या फिल्ड ऑफिसर सरिता म्हणाल्या, ‘मी येथे एचआयव्हीचा रुग्ण पाहिला. महिलेची प्रसूती होणार होती पण ती एचआयव्ही पॉझिटिव्ह होती, त्यामुळे तिचा रक्तदाब कोणीही तपासला नाही किंवा तिच्यावर उपचारही केले नाहीत. दुपारी तीन वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ती तशीच पडून होती, तेवढ्यात दुसरा कर्मचारी आला, त्याने महिलेची  प्रसूती केली, तोपर्यंत मूल मेले होते, पण हे लोक सांगत होते की मुलगा जिवंत आहे, पण त्यांनी त्याला मशीनमध्ये टाकले आहे. त्यामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला.

दिशा सालियन हत्या प्रकरणात राणेंनी केलेल्या आरोपांना आदित्य ठाकरेंचं प्रतिउत्तर

Latest Posts

Don't Miss