spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई इंडियन फॅन्स साठी खुश खबर; घातक गोलंदाज आयपीएलमध्ये करणार कहर

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चषक उंचावलेला संघ असूनही आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने (MI) अत्यंत खराब कामगिरी केली. खासकरुन त्यांची गोलंदाजीची बाजू कमकुवत दिसून येत होती. त्यात मेगा लिलावाच त्यांनी जोफ्रा आर्चरला तब्बल ८ कोटी रुपये देऊन खरेदी केलं. तो दुखापतग्रस्त असूनही त्याला इतकी रक्कम देऊन मुंबईनं खरेदी केलं होतं. पण तो एकही सामना खेळू शकला नाही. पण आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) जोफ्रा दुखापतीतून सावरत असल्याचं समोर येत आहे.

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या आगामी हंगामासाठी सर्व फ्रँचायझींनी तयारी केली आहे. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक संदेशही जारी केला आहे. जे पाहिल्यानंतर असे दिसते की संघाचा घातक गोलंदाज जोफ्रा आर्चर आगामी हंगामात पुनरागमन करू शकतो. जोफ्राचे फायर ब्रीदिंग बॉल्स पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. मुंबईने नुकतेच जोफ्राला रिटेन लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. दुखापतीमुळे बराच काळ मैदानाबाहेर असलेला इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आता बर्‍यापैकी दुखापतीतून सावरला असून तो आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार अशी दाट शक्यता आहे. जोफ्राने गोलंदाजीचा सरावही सुरू केला असून. जोफ्रा त्याच नेटमध्ये सराव करताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जोफ्रा पुन्हा आपल्या जुन्या लयीत परतताना दिसत आहे.

मुंबई लिलावात २०.५५ कोटी रुपये घेणार असून एक मिनी ऑक्शनसाठी ही रक्कम एक मोठी रक्कम आहे. पण आयपीएल २०२२ मधील अनुभव पाहता मुंबईला खेळाडूंच्या निवडीत हुशारी दाखवावी लागणार आहे. सध्या त्यांच्याकडे तीन परदेशी खेळाडूंसाठी जागा आहे. भारतीय खेळाडूंसाठीही बरीच जागा असून लिलावात मुंबईला चांगले मधल्या फळीतील फलंदाज आणि फिनिशर खेळाडू शोधण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. त्यात पोलार्डची जागा भरून काढणं सोपं काम नसणार आणि गोलंदाजीतही फिरकीपटू मुंबईला गरजेचे आहेत.

हे ही वाचा : 

Margashirsha Laxmi Pooja 2022 : महिलांनो मार्गशीर्ष महिन्याचं व्रत करताय ? मग आता एक क्लिकवर व्हा वायरल

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचे नुकसान केल्या मुळे अमृता धोंगडेला सुनावली ही शिक्षा

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss