spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विक्रम गोखले यांची तब्येत बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

मराठी सिनेमा सृष्टिले दिग्ज अभिनेते विक्रम गोखले यांची तिबेट खालवल्याची माहिती मिळत आहे. त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे . मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावर गेले १५ दिवस याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या खालावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गेल्या १५ दिवसांपासून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. आज असे अपडेट समोर आले असून त्यांची प्रकृती बिघडली आहे आणि त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले. त्यांची प्रकृती आता चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप याविषयी कोणतेही निवेदन किंवा माहिती समोर आलेली नाही.

अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काहीच दिवसात अभिनेत्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. विक्रम यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. सध्या विक्रम गोखले ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकांविषयी बोलायचे झाल्यास काही वर्षांपूर्वी आलेली त्यांची स्टार प्रवाहची मालिका ‘अग्निहोत्र’ विशेष गाजली होती. या मालिकेत विक्रम यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

विक्रम गोखले यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४५ झाला होता. विक्रम गोखले हे भारतीय चित्रपट, दूरदर्शन आणि रंगमंच गाजवणारे अभिनेता आहेत. विक्रम गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र आहेत. गोखले यांनी २०१० मध्ये मराठी चित्रपट ‘ आघाट’द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले . त्यांना २०११ मध्ये संगीत नाटक अकादमी , भारताच्या राष्ट्रीय संगीत, नृत्य आणि नाटक अकादमीने दिलेला रंगभूमीवरील अभिनयासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१३ मध्ये, त्यांच्या अनुमती या मराठी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळाले होते.

 

हे ही वाचा : 

Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नव्या पात्राची एन्ट्री

Priyanka Chopra : प्रियांकाने शेअर केली लेकीची पहिली झलक

“RSS कडून सुपारी घेत राज ठाकरे हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करतायेत”

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss