spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वेळीच कारवाई झाली असती तर तिचा जीव वाचला असता ; श्रद्धाने लिहिलेलं पत्रावर फडणवीसांनी केलं भाष्य

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिवसागणिक नवे खुलासे होत आहेत. आपल्यावर येणाऱ्या प्रसंगाची श्रद्धा वालकरला गेल्या दोन वर्षांपासून माहिती होती का? असा विचार करायला लावणारं एक पत्र समोर आलं आहे. यानुसार आफताबपासून जीवाला धोका असल्याची तक्रार श्रद्दानं२०२० मध्येच केली होती, अशी माहिती समोर येत आहे. यात आफताब गळा दाबून मारण्याची आणि मृतदेहाचे तुकडे करण्याची धमकी देत असल्याचं या तक्रारीत नमूद आहे. तसंच आफताबच्या संपूर्ण कुटुंबालाही त्याच्या या वागण्याची माहिती होती, असंही श्रद्धानं या पत्रात लिहील्याचं समोर आलं आहे. मात्र ही तक्रार दाखल केली, त्यावेळी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून आफताबला केवळ समज दिल्याची माहिती आहे. परंतु यावर वेळीच कारवाई का केली नाही? असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीड यांनी निर्माण केला आहे.

हेही वाचा : 

विक्रम गोखले यांची तब्येत बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील श्रद्धाने लिहिलेलं पत्र गंभीर असल्याचं म्हटलं आहे. मी श्रद्धाने लिहिलेलं पत्र वाचलं. पत्र लिहूनही पोलिसांनी कारवाई का केली नाही, याची चौकशी करणार आहे. मी कोणावरही आरोप करत नाही. मात्र वेळीच कारवाई झाली असती तर तीचा जीव वाचला असता, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

“RSS कडून सुपारी घेत राज ठाकरे हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करतायेत”

श्रद्धा आणि आफताब यांचे सुरुवातीपासूनच भांडणं सुरु होती. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. आफताब हा गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली असल्याचे समोर आले आहे. मात्र पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर श्रद्धा आज या जगात असती, अशीही चर्चा रंगली आहे.

Supriya Sule: जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करतयं; सुप्रिया सुळेंची जहरी टीका

Latest Posts

Don't Miss