spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात शाळेत शिकणाऱ्या मुलाविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील गुन्हेगारीबद्दल अनेक घटना पाहायला मिळाल्या आहेत. पण आता पुण्यातुन एक वेगळ्याच प्रकारचा गुन्हा घडल्याची माहिती सामोरं आली आहे. येणारा काळ हा तरुण पिढीसाठी भयाव असू शकतो याच कारण म्हणजे नुकताच पुण्यात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्या शाळेत शिकणाऱ्या मुलीचा फोटो मुलाने स्वतःच्या इंस्टाग्राम स्टेट्सवर ठेउन “माझी बायको होशील का?” असे त्यात लिहिले आहे. पण हा प्रकार मुलाच्या चांगलाच अंगलटी आला आहे. या प्रकारची माहिती संबंधित मुलीच्या आईला कळताच मुलीच्या आईने मुलाची तक्रार थेट पोलिसात केली आहे, त्यामुळे मुलाच्या विरोधात गुन्हा देखील नोंदवला गेला आहे .

सध्याच्या काळात सोशलमिडीयाचा वापर हे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच करताना आढळून येत तसेच हेच सोशल मीडिया हे आहे अपराध्याला कारणीभूत सुद्धा ठरू शकत असाच एक प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातिल १४ वर्षीय मुलाने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीला इंस्टाग्रामवरुन तिचा फोटो टाकून माझी बायको होशील का? असा स्टेटसच ठेवला आणि तो व्हायरल देखील केला. हा सगळा प्रकार जेव्हा त्या मुलीला कळाला तेव्हा तिने त्या मुलाची तक्रार आईकडे केली. हां संपूर्ण प्रकार पाहून आईने थेट पोलिसात धाव घेतली आणि संबंधित मुलाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हा मुलगा पुण्यातील हडपसर भागातील एका नामांकित शाळेत शिकत होता या 14 वर्षीय मुलावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही एकाच शाळेत शिकायला असल्याने यातील मुलाने अनेक वेळा त्या मुलीकडे मैत्रीची मागणी केली होती. काही दिवसांपासून हा मुलगा त्या मुलीचा पाठलाग करीत असे. तसेच मैत्री करण्यासाठी तिला वारंवार धमक्या द्यायचा. माझ्यासोबत मैत्री कर अन्यथा उचलून घेऊन जाईन अशी धमकी देखील त्याने या मुलीला दिली होती. त्या मुलीने मात्र काहीच उत्तर न दिल्यामुळे त्याने तिचा फोटो घेऊन “माझी बायको होशील का” असे स्टेटस इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

शिंदे-फडणवीस सरकार एकाच घरातील तीन तीन लोकांवर… ; जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

Latest Posts

Don't Miss