spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Vikram Gokhale : ‘विक्रम गोखलेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, कृपया अफवा पसरवू नये’, गोखले कुटुंबीयांचे आवाहन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती दीनानाथ रुग्णालयाकडून मिळत आहे. काल रात्री विक्रम गोखले यांच्या मुलीनं प्रसार माध्यम ANI ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर असून ते लाइफ सपोर्टवर आहेत. त्याच्यासाठी प्रार्थना करत राहा.’ विक्रम गोखले यांच्या पत्नी वृषाली गोखले यांनी वृत्तवाहिनी एबीपी न्यूजला विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या,’ते काल कोमामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी काहीही रिस्पॉन्स दिलेला नाही.’ सध्या विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन गोखले कुटुंबीयांनी केले आहे.

हेही वाचा : 

अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, हिंमत असेल तर अडवून दाखवा; शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

चार दिवसांपूर्वी विक्रम गोखले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल बुधवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली. रात्री उशिरा काही न्यूजपोर्टलवर निधनाची बातमी प्रसिद्ध झाली होती. अभिनेता अजय देवगणनेही श्रद्धांजली वाहणारे ट्विट केल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. सोशल मीडियावरील चर्चेनंतर अखेर कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिलंय. ‘विक्रम गोखलेंवर रुग्णालयात उपचार सुरू असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. कृपया अफवा पसरवू नये’, असं आवाहन कुटुंबीयांनी केलंय.

नुकताच ३० ऑक्टोबरला विक्रम गोखले यांनी त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा केला. विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची कायम पसंती मिळाली आहे.काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.

विक्रम गोखले यांची तब्येत बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Latest Posts

Don't Miss