spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे…’ , सुषमा अंधारेंची सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान मुलीसोबत धमाल

ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्गातील मालवण येथे अंधारेंनी लेकीसोबत समुद्र सफर करत डॉल्फिन दर्शनाचा आनंद लुटला. या दौऱ्यावेळी त्यांनी आपल्या लहानग्या कब्बूसोबत म्हणजेच सुषमा यांची मुलगी कबिराहीसह मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर धम्माल मस्ती केली. त्याचा फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट केला आहे.

हेही वाचा : 

CM Eknath Shinde : साईबाबा मला सांभाळा असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘कारण’

सुषमा अंधारे यांनी त्यांच्या फेसबुकवर लेक कबिरासोबतचा मालवण समुद्र किनाऱ्यावरचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात दोघी मायलेकी समुद्रातील पाण्यात दिसत आहेत. सुषमा अंधारे यांनी आपल्या लेकींना मायेनं जवळ घेतलं आहे. तर लाडकी कब्बू आपल्या प्रेमळ मायला घट्ट बिलगलेली दिसत आहे. समोर निळाशार समुद्र आणि लाटांचे तरंग यामध्ये या दोघी मायलेकी आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करत आहे. या फोटोवर सुषमा अंधारे यांनी एक कॅप्शन दिलं आहे. मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे…, अशी कॅप्शन त्यांनी या फोटोला दिली आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे या कोकणाच्या दौऱ्यावर असून त्यांनी एक राजकीय पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. कोणत्याही चळवळीला सैद्धांतिक पाया नसेल, वैचारिक दृष्टी नसेल. इतिहासाकडे बघण्याचा वास्तववादी दृष्टिकोन नसेल, समाजातील अंत: प्रवाहाचे भान नसेल तर अशी चळवळ जातीच्या कोषातून बाहेर पडण्याची शक्यता नसते.चळवळ कितीही विद्रोही असली तरी तिचे महत्त्व मोठेपण हे जातीच्या कोषातून बाहेर पडण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते, असं सुषमा अंधारे यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Watch video : ‘भाईयो और बहनो…’ म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल, व्हिडीओमध्ये पाहा

सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा काल सिंधुदुर्गातील कणकवली येथे दाखल झाली. यावेळी त्यांनी सभा घेतली. दरम्यान त्यांनी पोलिसांवर निशाणा साधला आहे. “तुम्ही पंतप्रधानांची नक्कल करता म्हणून तुमच्यावर केस टाकल्याचे पोलीस सांगतात. आता पोलीस डिपार्टमेंटचा कॅमेरा चालू आहे. पण या डिपार्टमेंटच्या कॅमेऱ्याला एक गोष्ट दिसत नाही का. आमचे चुलत भाऊ असणारे राज भाऊ (राज ठाकरे) यांचा नकालांमध्ये कुणी हात धरेल का?, त्यांच्यावर केस टाकण्याची पोलिसांनी हिंमत केली का?”, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

अरबी समुद्रात जलसमाधी घेणार, हिंमत असेल तर अडवून दाखवा; शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर

Latest Posts

Don't Miss