spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

VIDEO : विराट कोहलीने सुरू केली बांगलादेश दौऱ्याची तयारी, इंस्टाग्रामवर दाखवली एक झलक

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या चांगला चर्चेत आहे. विशेष म्हणजे विराट त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे तो कायम चर्चेत असतो. दोन दिवसापुर्वी कलरफुल टी-शर्ट घातल्यामुळे त्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यावर चाहत्यांनी कमेंट करुन अनेक प्रश्न विचारले. पुढच्या महिन्यात झिम्बाब्वे दौरा होणार आहे.

विराट कोहलीने जिममध्ये घाम गाळला

भारतीय संघ पुढील महिन्यापासून बांगलादेशविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतून कोहली टीम इंडियात परतणार आहे. तर विराट कोहलीने या मालिकेसाठी जिममध्ये प्रशिक्षण सुरू केले आहे. त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून जिममध्ये ट्रेनिंग करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कोहली मेहनत आणि घाम गाळताना दिसत आहे. कोहलीची धडाकेबाज बॉडी पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. कोहलीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात… काय बोलावं… – अजित पवार

भारत विरुद्ध बांगलादेश दौर्‍याचे संपूर्ण वेळापत्रक

भारताला बांगलादेशमध्ये तीन एकदिवसीय सामने (डिसेंबर ४, ७ आणि १०) आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील एक मजबूत संघ शेजारच्या देशाचा दौरा करेल. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान चितगाव येथे आणि २२ ते २६ डिसेंबर दरम्यान मीरपूर येथे कसोटी सामने खेळवले जातील.

हेही वाचा : 

यापुढे अवमान करण्याचा कोणी प्रयत्न केला तर… ; उदयनराजे भोसले संतापले

एकदिवसीय टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल.

टीम इंडिया कसोटी संघ: रोहित शर्मा (क), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.

Latest Posts

Don't Miss