spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

२७ देशांची यात्रा करून सदगुरू जग्गी वासुदेव यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

अभियानाविषयी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती दिली. तसेच सद्गुरू यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उपक्रमाबद्दल आपले काही अनुभव त्यांना सांगितले.

सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.आणि त्यांनी सेव्ह ऑइल चळवळीबद्दल माहिती सांगितली.माती वाचवा या मोहीमेमुळे सर्वत्र जनजागृती होताना दिसतेय. मातीची गुणवत्ता तसेच संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या या मोहिमेला महाराष्ट्राचा पूर्ण पाठिंबा असेल असं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांना सांगितले.

मातीचा ह्रास कमी रोखण्यासाठी जागृता निर्माण करण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी २७ देशांमध्ये २५ हजार किलो मीटर ची यात्रा करत माती वाचवा हा उपक्रम केला आहे. यावेळी या अभियानाविषयी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती दिली. तसेच सद्गुरू यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उपक्रमाबद्दल आपले काही अनुभव त्यांना सांगितले.

 

मातीचा होणारा ऱ्हास लक्षात घेता त्याच्या संवर्धनासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी ही मोहीम सुरू केली. यात्रा करून आज भोपाळ, नाशिक मार्गे मुंबईत दाखल झाले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सद्गुरू जग्गी वासुदेव यांना शुभेच्छा देत राज्यात सुरू असलेल्या उपक्रमांबद्दल सांगितले. सद्गुरू वासुदेव यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे,राघवेंद्र शास्त्री तसच सहकारी उपस्थित होते.

 

Latest Posts

Don't Miss