spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दोन दिवसीय दौरा; लक्ष शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे दोन दिवसांच्या कोकण (Konkan) दौऱ्यावर येत आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे दोन दिवसांच्या कोकण (Konkan) दौऱ्यावर येत आहेत. २५ नोव्हेंबरला ते रत्नागिरीत (Ratnagiri) असतील तर २६ नोव्हेंबर रोजी ते सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने (BJP) कोकणावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा निश्चितच महत्त्वाचा आहे.

आतापासूनच भाजप रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघावर दावा करत आहे. त्याचवेळी शिंदे गट (Shinde Group) देखील हा लोकसभा मतदारसंघ आमचा असल्याचं म्हणत आहे. अशा राजकीय परिस्थितीमध्ये बावनकुळे यांचा दौरा निश्चितच महत्त्वाचा आहे. या दौऱ्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे ‘धन्यवाद मोदीजी’ या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी भेट देणार असून त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत. बाईक रॅली, जिल्हा संघटनात्मक मेळावा, सोशल मीडिया बैठक, बूथ समिती बैठक, युवा वॉरिअर शाखांचे उद्घाटन अशा प्रकारचे कार्यक्रम चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या दौऱ्यामध्ये होणार आहेत.

सध्याच्या घडीला कोकणात भाजपची राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. कणकवली इथे नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या रुपाने भाजपचा एकमेव आमदार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये कोकणात आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या दृष्टीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा महत्त्वाचा असेल.

राज्यातल्या विशेष अशा १६ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. सध्या ठिकाणी विनायक राऊत यांच्या रुपाने शिवसेनेचा खासदार आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजप जोरदार तयारी करत आहे. यापूर्वी देखील केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा, आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दौरा केला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांचा मागील तीन महिन्यातला दुसरा तर प्रदेशाध्यक्ष म्हणून हा पहिलाच दौरा आहे.

हे ही वाचा:

Shivsena : ठाकरे गटातील शिवसेनेच्या महिला नेत्यांत गटबाजी?

Sanjay Raut : संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या ईडीच्या याचिकेवर आज होणार सुनावणी

रिफायनरीचा मुद्दा पुन्हा तापला! ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचं शक्तीप्रदर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss