spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लोकांनी दुसऱ्या विषयाकडं वळावं आणि छत्रपती शिवरायांचा अपमान विसरावा ; संजय राऊत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ४० गावं कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केलाय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्यानं विचार करत आहोत, असं मुख्यमंत्री म्हणालेत. बोम्मईंच्या दाव्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय.

हेई वाचा : 

Raj Thackeray : राज ठाकरे २९ नोव्हेंबरला कोल्हापुरात घेणार मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

राऊत म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रावर जो अचानक हल्ला केला आहे, यामागे फार मोठं कारस्थान आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या नेत्यांकडून शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. राज्यपाल कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांवर चिखलफेक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावरून लक्ष विचलित व्हावं, म्हणून बोम्मईंना पुढे करून महाराष्ट्रातल्या काही गावांवर हक्क सांगण्याचा प्रयत्न आहे.जेणेकरून लोकांनी दुसऱ्याविषयाकडे वळावं आणि शिवाजी महाराजांचा अपमान विसरावा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर

महाराष्ट्रातील एक इंचही भूमी आम्ही कोणाला देणार नाही. शिवसेननं ६९ हुतात्मे दिले. आम्हालाही हुतात्म पत्करावं लागलं तरी चालेल, आम्हाला तुरुंगाची भीती नाही, असा इशारही राऊत यांनी यावेळी दिला. शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. बोम्मईंच्या हल्ल्यामागं मोठं षडयंत्र असून विषय वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा दोन दिवसीय दौरा; लक्ष शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर

Latest Posts

Don't Miss