spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री पुन्हा आमदार-खासदारांसह झाडी,डोंगर ,हॉटेल बघायला गुवाहटीच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार यांचा गुवाहटी दौरा पक्का झाला आहे. पूर्वनियोजित असलेल्या या गुवाहाटी दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला होता. आता या दौऱ्याची नवी तारीख शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आली असून या दौऱ्याचे नियोजन कसे असेल याची देखील माहिती समोर आली आहे.

शिंदे गटाचे सर्व आमदार २१ नोव्हेंबरला गुवाहाटी दौऱ्यावर जाणार होते. मात्र, २१ तारखेचा दौरा रद्द करण्यात आला होता. आता या दौऱ्याची नवी तारीख जाहीर झाली आहे. आता जाहीर केलेल्या माहितीसुनार शिंदे गटाचे सर्व आमदार आणि खासदार कुटुंबासह २६ नोव्हेंबरला संध्याकाळी गुवाहटीला जाणार आहेत. २७ नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.

हेही वाचा : 

Maharashtra Shahir : बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचं नवं पोस्टर आऊट

शिवसेना ठाकरे गटाकडून मध्यावधीच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठीच ते जात असून गुवाहटीतील सत्तानाट्यवेळी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचीच ते भेटही घेणार आहेत. गुवाहाटीच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एका विशेष पूजेचं आयोजन करण्यात आले आहे. सत्तांतराच्या काळात जी पूजा झाली त्याच पद्धतीची ही पूजा असणार आहे. महाराष्ट्रात सरकार बनवल्यानंतर पुन्हा एकदा तुझ्या दर्शनाला येईन असं साकडं एकनाथ शिंदे यांनी घातलं होते. म्हणूनच आता शिंदे आणि आमदार गुवाहाटीला जात आहे. या दौऱ्याची पूर्वतयारी सुरू असून जाण्या येण्याचं नियोजन आखलं जात आहे.

शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीचा दौरा करुन आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरुय. राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितलं जातंय. पण त्याचा मुहूर्त अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. कदाचित हा मुहूर्त गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनानंतरच निश्चित होण्याची शक्यता आहे.

गेल्या ४८ तासांपासून विक्रम गोखलेंवर उपचार सुरु; प्रकृतीविषयी डॉक्टरांकडून मोठी Update समोर

Latest Posts

Don't Miss