spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs NZ 1st ODI : पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा केला पराभव

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड येथे नुकताच पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने जबरदस्त फलंदाजीचं दर्शन घडवत ३०७ धावांचं आव्हान केवळ ४७.१ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण करत भारतावर ७ विकेट्सनी विजय मिळवला आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेतही किवींनी १-० अशी आघाडी घेतली आहे. आधी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने केला. ज्यानंतर भारताने सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या ८० धावांच्या जोरावर ३०६ धावां केल्या. ज्या न्यूझीलंडने टॉम लेथमच्या नाबाद १४५ आणि कर्णधार केनच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर पूर्ण करत सामना जिंकला.

हेही वाचा : 

Virat Kohli and Anushka Sharma : विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे पाहा अलिबागच्या बंगल्याचे खास फोटो

३०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या न्यूझीलंडने धीमी सुरुवात केली. पहिली विकेट त्यांचा लवकर गेला. शार्दुल ठाकूरने आठव्या ओव्हरमध्ये सलामीवीर फिन एलनला ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ३५ होती. फिनने २२ धावा केल्या. त्यानंतर वनडे डेब्यु करणाऱ्या उमरान मलिकने डेवॉन कॉनवेला आऊट केलं. कॉनवेने २४ धावा केल्या. न्यूझीलंडच्या ८८ धावा असताना डॅरेल मिचेलच्या रुपाने तिसरी विकेट गेली. उमरानने ही विकेट काढली.

Education : पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना मतदार नोंदणी आवश्यक

विलयम्सन आणि लॅथमने शानदार भागीदारी करुन भारताच्या हातून विजय हिसकावला. लॅथमने १०४ चेंडूत नाबाद १४५ धावा फटकावल्या. त्याने १८ चौकार आणि ५ षटकार लगावले. विलयम्सनने ९८ चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या. यात ७ चौकार आणि १ षटकार होता. विलयम्सन आणि लॅथमने चौथ्या विकेटसाठी नाबाद २२१ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध झालेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

Yuvasena: चमकायला शो सैनिक, केसेसमध्ये अडकायला शिवसैनिक

Latest Posts

Don't Miss