spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मनसेची आज मुंबईतील नेस्को ग्राउंडवर सभा होणार, राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत नेस्को ग्राउंडमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ आज पुन्हा धडाडणार आहे. मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई गोरेगावमधील नेस्कोला दुपारी ४ वाजता गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी मे महिन्यात राज ठाकरे यांनी औरंगाबादला शेवटची सभा (Raj thackeray speech) घेतली होती. त्यानंतर काहीच दिवसात राज्यातील महाविकास आघाडीच सरकार कोसळलं आणि राज्यांत नवं सरकार आलं. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर राज ठाकरेंचा हा पहिलीच मोठी सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमकं कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा : 

भाजपचे गुजरातमध्ये ऑलिम्पिक आयोजनासह २०लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(EKnath shinde ), मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळं आज राज ठाकरे पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे. पण या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

गांधींच्या हत्येमागे काँग्रेस, रणजित सावरकरांचा काँग्रेसवर थेट आरोप

राज ठाकरे यांच्या उत्तर मुंबईतील मागाठाणे आणि चारकोप विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून दौऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिक मतदार निर्णायक भूमिका बजावतात. २००७ मध्ये मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीत मनसेने पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती आणि ७ जागा जिंकल्या. त्यानंतर २०१२च्या महापालिका निवडणुकीत २७ जागा आणि २०१७ च्या निवडणुकीत फक्त ७ जागा जिंकल्या होत्या.

दरम्यान, सीमा वाद, राज्यपालांचे शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य यावर राज ठाकरे काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागलेलं आहे. आज सभेत राज ठाकरे कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार, याचीही उत्सुकता आहे. पण या मेळाव्यानंतर २९ नोव्हेंबरपासून राज ठाकरेंचा कोकण दौरा देखील सुरु होणार आहे.

Body ache in winter हिवाळ्यात अंगदुखी होते का ? जाणून घ्या उपाय

Latest Posts

Don't Miss