spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमिताभ बच्चन यांच्या आठवणीतले विक्रम गोखलेंची, ‘ते आमच्या आयुष्यात आले, त्यांची भूमिका बजावली आणि निघून गेले’

बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांना विक्रम गोखले व अभिनेत्री तबस्सुम यांची आठवण आली म्हणाले ‘ते आमच्या आयुष्यात आले, त्यांची भूमिका बजावली आणि निघून गेले’ अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर ज्येष्ठ अभिनेते आणि मित्र विक्रम गोखले आणि अभिनेते आणि प्रसिद्ध टेलिव्हिजन होस्ट तबस्सुम यांच्या स्मरणार्थ एक छोटीशी नोंद लिहिली आहे. ते म्हणाले की ‘दिवस दुःखाने भरलेले आहेत’ कारण सर्वांनी ‘आपापली भूमिका बजावली आणि स्टेज रिकामा सोडला’. तबस्सुम यांचे १९ नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर रोजी पुण्यात अनेक अवयव निकामी झाल्याने निधन झाले.

विक्रम गोखले आणि अभिनेत्री तबस्सुम या दोघांची आणि इतर काही जवळच्या व्यक्तींची आठवण करून, अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले, “दिवस दुःखाने भरलेले आहेत,मित्र आणि सहकारी, प्रचंड गुणवत्ता असलेले कलाकार, दिवसेंदिवस आम्हाला सोडून जातात, आणि आम्ही ऐका बघा आणि प्रार्थना करा तबस्सुम,विक्रम गोखले आणि जवळचे आणि ओळखीचे काही प्रियजन, ते आमच्या आयुष्यात आले,त्यांनी त्यांची भूमिका बजावली आणि त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्टेज रिकामे आणि उजाड झाले.” असे अमिताभ बच्चन यांनी ब्लॉग मध्ये लिहिले आहे. बैजू बावरा आणि मुघल-ए-आझम यांसारख्या अनेक हिंदी क्लासिक्समध्ये बालकलाकार म्हणून ओळखल्या जाणार्‍या तब्बस्सुमचे आणि लोकप्रिय दूरदर्शन टॉक शो फूल खिले हैं गुलशन गुलशनचे होस्ट म्हणूनही गेल्या आठवड्यात निधन झाले. ती ७८ वर्षांची होती.

तर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले विक्रम गोखले यांचे शनिवारी पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांनी अमिताभ बच्चन स्टारर अग्निपथ (१९९०) आणि खुदा गवाह (१९९२) मध्ये काम केले होते. २०२० मध्ये, अमिताभ बच्चन यांनी विक्रम गोखले अभिनीत AB Ani CD या मराठी चित्रपटात स्वत:ची भूमिका साकारली.

Dhrishyam 2 : अजय देवगणचा दृश्यम २ ची नवव्या दिवशी १५० कोटींची कमाई

Latest Posts

Don't Miss