spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लॉकडाऊनला विरोध करत, हुकूमशाही नको, लोकशाही हवी असा म्हणत, चीनमध्ये जिनपिंग यांच्या विरोधात लोक रस्त्यावर

चीनमध्ये शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या सरकारविरोधात लोकांचा रोष वाढत आहे. एकीकडे कोरोनाची वाढती प्रकरणे आणि दुसरीकडे शून्य कोविड पॉलिसीमुळे बळजबरीने घरात डांबून ठेवल्याने लोक नाराज आहेत. दरम्यान, चीनच्या पश्चिम शिनजियांग भागात लागलेल्या भीषण आगीच्या घटनेमुळे लोकांच्या संतापाला आणखी उधाण आले आणि आता ते अनेक शहरांमध्ये कोविड-१९ संबंधित लॉकडाऊनविरोधात (Lockdown) रस्त्यावर उतरले आहेत.

हेही वाचा : 

MS Dhoni , पांडे बंधू एकत्रित पार्टीमध्ये काला चष्मा या गाण्यावर थिरकले

आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक रस्त्यावर बॅनर घेऊन उभे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. बॅनरवर लिहिले आहे- नीड ह्युमन राइड, नीड फ्रीडम म्हणजे आपल्याला मानवी हक्क आणि स्वातंत्र्य हवे आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये लोक शी जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसून येत आहे. आंदोलक म्हणाले- ‘ जिन पिंग व कम्युनिस्ट पक्षाने सत्तेतून पायउतार व्हावे पायउतार व्हा’. आम्हाला कोरोना चाचणीची गरज नाही. आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. हुकूमशाही ऐवजी लोकशाही हवी आहे.

हा सगळा गोंधळ अशा वेळी घडला आहे जेव्हा कोविडचा (China Lockdown)) एक नवीन प्रकार चीनमध्ये खळबळ माजवत आहे. विषाणूचा स्फोट इतका भयानक झाला आहे की सर्व जुने रेकॉर्ड मोडले गेले आहेत. एका दिवसात ३५ हजार केसेस येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कडक लॉकडाऊन अंतर्गत, ज्या भागात कोविडचे प्रकरण आढळून आले आहे, त्या संपूर्ण भागात बॅरिकेड्स आणि टिन शेड लावून सील करण्यात आले आहे. ज्या इमारती आणि घरांमध्ये कोविड प्रकरण आढळले आहे. तेथे बाहेरून घरे सील केली जात आहेत.

उद्धव ठाकरेंच्या आरोपाला शिंदे गटाच्या आमदाराचं थेट आव्हान

झालं काय?

शिंजियांगची राजधानी असलेल्यी उरुमकीमध्ये गुरुवारी एका इमारतीला आग लागली होती. त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कठोर निर्बंधामुळे ही इमारत बंद होती. त्यामुळे लोकांना वाचवण्यात अपयश आलं. यानंतर चीनमधील नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी रस्त्यावर उतरून निर्बंध हटवण्याबाबत सरकारविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.

माजी मुख्यमंत्री ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर आजही ‘वर्षा’च्या प्रेमात?

Latest Posts

Don't Miss