spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यपाल कोश्यारींना दिलेला अल्टीमेटम संपला,आता मविआची पुढील भूमिका ‘महाराष्ट्र बंद’?

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात महत्त्वाच्या घडामोडी २ दिवसांपूर्वी घडली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र बंद करण्याबाबत सूचक विधान केलं होतं. त्यानंतर बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे खरंच महाराष्ट्र बंदची घोषणा करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हेही वाचा : 

आमच्या सरकारबद्दल लोकांचे मत चांगले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यपालांवर (Governor Bhagat Singh Koshyari) कारवाई न झाल्यास पुढील भूमिका२८ नोव्हेंबरला ठरवू असा अल्टीमेटम उदयनराजे भोसले यांनी दिला होता. कोश्यारी यांच्यावर कारवाई न झाल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण मार्गाने महाराष्ट्र बंदचा इशारा दिला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र बंदसाठी महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडून प्रयत्न केले जात होते. राज्यपालांना राज्यातून हटवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदमध्ये ठाकरे गटासह मित्र पक्षांनीही सहभागी व्हावे यासाठी आता खासदार संजय राऊत यांनी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चाही राऊत यांनी केली होती.

राज्यपालांवर कारवाई न झाल्यास पुढील भूमिका २८ नोव्हेंबरला ठरवू असा अल्टीमेटम उदयनराजे भोसले यांनी दिला होता. तर ठाकरे गट आणि महाविकास आघाडी एकत्रित येत महाराष्ट्र बंद बाबत आज भूमिका ठरवणार आहेत. तर उदयनराजे भोसले, संभाजीराजे यासंदर्भात काय भूमिका घेणार याकडे राज्याचं लक्ष्य लागून आहे.

राज ठाकरेंचा राहुलगांधींवर खरपुस शब्दांत टीका

गुजराती, मारवाडी महाराष्ट्रात का आले ? ; राज ठाकरे

इथले गुजरात, मारवाडी परत गेले तर काय होईल, कोश्यारी जी गुजराती आणि मारवाडी समाजाला विचारा तुमचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आला हा प्रश्न विचारा? उद्योग धंदे थाटण्यासाठी आणि व्यापारासाठी ही जमीन सुपीक होती. महाराष्ट्र मोठा होता आणि आहे. देश नव्हता त्यावेळी या भागाला हिंद प्रांत म्हणतं. या हिंद प्रांतावर आक्रमण झाली. मोगल आले, ब्रिटीश, पोर्तुगीज आले. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्ष मराठेशाहीनं राज्य केलं. महाराष्ट्र समृद्ध होताच, महाराष्ट्र काय आहे हे कोश्यारी यांच्याकडून ऐकायचं नाही. गुजराती आणि मारवाडी समाजाला सांगितलं की तुमच्या राज्यात जा ते जातील का? असा सवाल राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला.

चंद्रपूरमध्ये रेल्वे ब्रिज कोसळून मोठी दुर्घटना, २० प्रवासी जखमी

Latest Posts

Don't Miss