spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Raut : नेहरुंपासून ते मोरारजींपर्यंत शिवरायांचा अवमान करणाऱ्यांनी माफी मागितली होती; राऊत म्हणाले…

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाने आज भाजपवर पु्न्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना ठाकरे गटाने आज भाजपवर पु्न्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भाजपच्या नेत्यांकडून, टगे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे आणि हीच मंडळी शहाणपण शिकवत असल्याची सडकून टीका राऊत यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानानंतर राज्यात असंतोष निर्माण झाला असल्याचे राऊत यांनी म्हटले. लवकरच विरोधी पक्षांकडून आंदोलनाची हाक दिली जाणार असल्याचे संकेत यावेळी खासदार संजय राऊत यांनी दिले.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, पंडित नेहरूंकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून अपमान झाला तेव्हा त्यांनी माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत बोलण्यात आणि लिखाणात चूक झाली असे लक्षात आल्यानंतरही त्यांनी पंतप्रधानपदी असलेल्या पंडित नेहरू यांनी माफी मागितली. मोरारजी देसाई यांचे महाराष्ट्राबाबत काही मतभेद, वादाचे मुद्दे असतील. पण, त्यांच्याकडूनही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य गेल्यानंतर त्यांनीदेखील माफी मागितली होती. पण भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे आणि उलट शहाणपण शिकवत आहेत, हे महाराष्ट्र पाहत असल्याचे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्र संतापला असून असंतोष निर्माण झाला आहे. वेळ आल्यावर याची प्रचिती दिसून येईल असा इशाराही त्यांनी दिला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान भाजपच्या नेत्यांकडून, राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून सुरू आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानावर, सरकारमधील मंत्री-आमदार किती दिवस शांत बसणार आहेत. हे आम्हीच नव्हे तर महाराष्ट्र पाहत आहे. किती दिवस शिंदे गटाचे आमदार हात चोळत बसणार आहेत, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला. छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका लोकभावना आहे. राज्यपालांचे कार्यक्रम उधळून लावणे हा इशारा त्यांनी दिला. ही जनभावना असून महाराष्ट्र अजूनही शांत आहे असे संजय राऊत यांनी म्हटले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान हा राज्यातील १२ कोटी जनतेचा अपमान असून लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांकडून आंदोलनाचा कृती-कार्यक्रम जाहीर होऊ शकतो असे संकेतही त्यांनी दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

हे ही वाचा:

बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांचे उपोषण, रिक्षा सेवा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय

water cut मुंबईत बीएमसीच्या १० वॉर्डांमध्ये चोवीस तास पाणीकपात, कोणत्या भागात फाटका बसणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss