spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MPSC: PSI-STI-Assistant मुख्य परीक्षेची तारीख पुढे ढकलली

महाराष्ट्र (Maharashtra) दुय्यम सेवा (Secondary service) अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२२ पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. प्रशासकीय कारणामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं MPSCनं स्पष्ट केलं आहे.

 २४ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ संयुक्त पेपर क्रमांक १ हा पुढे ढकलण्यात आला आहे. सोबतच ३१ डिसेंबर २०२२ रोजी होणारा महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा, ७ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २, राज्य कर निरीक्षक पदाची परीक्षा आणि १४ जानेवारी २०२३ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील एक प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचं देखील आयोगानं म्हटलं आहे.

 सहायक आयुक्त (औषधे) पदासाठीच्या परीक्षेकरता दिलेला अभ्यासक्रम मागो एमपीएससीकडून सहायक आयुक्त (औषधे), वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, गट-अ संवर्गाच्या परीक्षेकरीता दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिध्द करण्यात आलेला अभ्यासक्रम प्रशासकीय कारणास्तव मागे घेण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सहायक प्रारुपकार-नि-अवर सचिव, गट-अ च्या भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि अंतिम निकाल/शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

शुभमन गिल भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होणार ?

Akshaya-Hardeek Wedding लगीन घाई झाली सुरु ! ‘या’ दिवशी राणा दा अन् पाठकबाईंच्या लग्नाचा बार उडणार

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss