नाशिक : पावसाळा सुरू झाला की ओढ लागते ती पावसाळी पिकनिकची. आणि पावसाळी पिकनिक साठी कर्जत, लोणावळा ,नाशिक, माळशेज असे वेगवेगळ्या घाटामध्ये जायला लोकांना फार आवडतं. धबधब्यामधील पाण्यात भिजत लोक आनंद लुटतात. आपल्याला हवा तसा डान्स करतात. आतापर्यंत तुम्ही लग्नात नागिन डांस पाहिला असेल पण सध्या तोच नागिन डांस आता नाशिकच्या घाटामध्ये झालेला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु हा प्रकार काहीसा जीव घेणा देखील ठरू शकतो.
नाशिक : पावसात तरुणांचा जीवघेणा डान्स व्हायरल, भर रस्त्यात हॉर्नच्या आवाजावर नागिन डान्स; पाहा VIDEO pic.twitter.com/ZEmfQ162aZ
— Renuka Dhaybar (@renu96dhaybar) July 11, 2022
हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला हसू देखील येईल आणि पण तितकाच राग देखील. काही तरुण पावसाचा आनंद घेत बाईकवरून एका मागे एक येतात त्याच्या मागून एक ट्रक देखील येताना दिसतोय. अचानक हे सगळे तरुण आपल्या बाईक थांबून रस्त्यावर उतरतात मागून आलेल्या ट्रक चालकाने नागिन हॉर्न वाजवला हे ऐकून सगळेच तरुण नागिन होनवर ठेका धरत वर रस्त्यात नाचत सुटतात. विचित्रपणे नाचत असलेल्या या तरुणांच्या डान्सला काही अर्थ आहे का? पावसाळी वातावरणात घाटातील हा तरुणांचा डान्स इतरांना त्रासदायक ठरला मागून येणाऱ्या वाहनांची कोंडी झाली.
हेही वाचा :
शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, मनसैनिकांन सोबत संवाद साधणार