spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Shraddha Murder Case मोठी बातमी! श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आलीय. श्रद्धाची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी अफताब पुनावाला याच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आलीय. श्रद्धाची निर्घृणपणे हत्या करणारा आरोपी अफताब पुनावाला याच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हल्लेखोरांकडे तलवारी होत्या. समोर आलेल्या माहितीनुसार, मारेकरी हे हिंदुत्ववादी संघटनेते कार्यकर्ते आहेत. दरम्यान, पोलिसांनी हवेत फायरिंग केल्याने हल्लेखोर दूर पळाले. नंतर आफताबला घेऊन पोलिसांची गाडी जेलकडे रवाना झाली. पण हल्ला करणाऱ्यांनी पोलीस व्हॅनवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अफताब पुनावाला याची आज पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्याला लॅबमधून जेलमध्ये नेलं जात होतं. या दरम्यान चार-पाच जणांनी हातात तलवार घेऊन अफताबवर हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्ल्याचा प्रयत्न करणारे हिंदू सेनेचे कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर येतेय. एफएसएल लॅबमधून जेलच्या दिशेने जात असताना आफताब पोलिसांच्या ज्या गाडीत बसला होता त्यावर चढण्याचा प्रयत्न देखील यावेळी झाला. हे हल्लेखोर कोण आहेत याबद्दल अजून नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार ते हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या हल्ल्यात आफताब पोलिसांच्या सुरक्षेत असल्याने बचावला आहे.

 यावेळी हल्लेखोरांनी अफताब ज्या पोलीस व्हॅन होता त्या व्हॅनवर तलवारीने हल्ला केला. पोलिसांनी यावेळी त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोर ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. या दरम्यान पोलिसांनी हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हिंदूसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तलवारी जप्त केल्या. पोलिसांनी हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तलवारी जप्त केल्या. संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद झालीय.

या दरम्यान प्रसारमाध्यमाच्या काही प्रतिनिधींनी हल्ला करणाऱ्या हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अफताब विषयीचा संताप व्यक्त केला. “आमच्या माता-बहिणींवर अत्याचार करत आहेत. मग त्याला अशाप्रकारे का मारु नये?”, असा प्रतिप्रश्न एका कार्यकर्त्याने पत्रकारांना केला. “आम्ही बंदूक आणि तलवार घेऊन येऊ. आम्ही जेलमध्ये जाऊ, आमच्या कोणत्याही बहिणीवर अत्याचार केला तर आम्ही त्याला मारु”, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने दिली.

हे ही वाचा : 

Kim Jong-un उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने केली उत्तराधिकाऱ्याची निवड?

युगपुरूषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे-उदयनराजे भोसले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss