spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Raut on Kashmir Files ‘काश्मीर फाईल्स भाजपचाच चित्रपट’, राऊत बोललेच!

काश्मीर फाईल्स आणि सीमावाद प्रश्नावरुन सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. यातच आज संजय राऊत यांनी काश्मीर फाईल्सबद्दल अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय.

काश्मीर फाईल्स आणि सीमावाद प्रश्नावरुन सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. यातच आज संजय राऊत यांनी काश्मीर फाईल्सबद्दल अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. शिवाय राज्य सरकराच्या दुबळेपणाचा पाढाच त्यांनी वाचला. ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) सिनेमानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले, असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले की, काश्मीर फाईल्स हा चित्रपट वल्गर असल्याचं म्हटलं आहे, ‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमा एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करणारा आणि दुसऱ्या पक्षाच्या विरोधात प्रचार करणारा सिनेमा आहे. या सिनेमाचा एका पक्षाने खूप प्रचार केला. त्यामुळे या सिनेमानंतर काश्मिरी पंडितांवरील हल्ले वाढले. सर्वात जास्त हत्या झाल्या, असं संजय राऊत म्हणालेत. ‘द काश्मीर फाइल्स’ २ सिनेमा यावी अशी जेव्हा मागणी होते तेव्हा या सिनेमाचे निर्माते यावर काही बोलत नाहीत. या सिनेमाच्या कमाईतून जमा झालेल्या रकमेतून काही रक्कम काश्मीरी पंडितांच्या अनाथ बालकांना, कुटुंबियांना द्यावी, अशी मागणी होते तेव्हा निर्माते त्यावर बोलत नाहीत. हा सिनेमा केवळ एका पक्षाच्या प्रचारासाठी हा सिनेमा तयार केला गेला, असं संजय राऊत म्हणालेत.

गोव्यात सुरू असलेल्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमावर भाष्य केलं. इस्रायली चित्रपट निर्माते नदाव यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला असभ्य आणि प्रचारकी चित्रपट असं म्हटलं. “आम्ही सर्वजण द काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहिल्यानंतर नाराज आणि आश्चर्यचकीत झालो होतो. हा चित्रपट आम्हाला प्रचाराशिवाय दुसरं काही वाटलं नाही. हा चित्रपट असभ्य होता आणि त्याची कथाही कमकुवत होती. एवढ्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिव्हलसाठी हा चित्रपट पूर्णपणे निरुपयोगी आहे”, असं नदाव लॅपिड यांनी म्हटलंय. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिलीय.

सीमावादाच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकी लोकं इथं येतात आणि त्यांचा झेंडा फडकवतात, हे साधंसुधं नाही. महाराष्ट्र सरकारचा याला पाठिंबा असल्याशिवाय हे घडणार नाही. त्यामुळे सरकारने पुढे येऊन आपली भूमिका मांडली पाहिजे, असं राऊत म्हणाले. प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्स हा आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गोव्यातील इफ्फी या चित्रपट महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी महोत्सवाचे परिक्षक नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाईल्स हा प्रोपगंडा करणारा आणि अश्लील चित्रपट असल्याचे म्हटले होते. त्यावरुन वादाला सुरुवात झाली आहे.

लॅपिड यांच्या वक्तव्याचे सोशल मीडियावर चांगलेच पडसाद उमटले आहे. त्यावर आतापर्यत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, चित्रपटाचे निर्माते अनिल पंडित, प्रमुख कलाकार अनुमप खेर यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी सत्य हे नेहमीच कटू असतं. खोटेपणाला कितीही मोठी उंची दिली तरी ते सत्यापुढे छोटेच असते. अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. काश्मीर फाईल्स हा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणारा मुद्दा आहे. या चित्रपटानं सर्वाधिक चर्चेत राहण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.

तसेच पुढे ते म्हणाले, बेळगावमध्ये बोलावून माझ्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय, कारस्थान केलं जातंय, मला अटक करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. माझ्यावर हल्ला करण्याची त्यांची पूर्ण तयारी आहे. मात्र, महाराष्ट्र झुकणार नाही मी बेळगावला जाणार, असं संजय राऊतांनी ठामपणे सांगितलं आहे.

संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. शिवसेनेने सीमा बांधवांसाठी ६९ हुतात्मा दिले आहेत. मी बेळगावचा ७० वा हुतात्मा व्हायला तयार आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंनी सीमा प्रश्नांसाठी तीन महिने तुरुंगवास भोगला होता. शिवसैनिकांनी त्यावेळेला तीन दिवस मुंबई पेटवली होती. त्यामुळे ती धग आमच्या मनात कायम आहे. मला अटकेची भीती नाही. महाराष्ट्रासाठी मला अटक होणार असेल तर मी नक्कीच बेळगावला जाईल’, असं संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

शिंदे गटातील नेत्यानं उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान, हिंमत असेल तर

RAJ THACKERAY पाच वर्षानंतर राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर

Jio नेटवर्कची मोठी समस्या, अद्याप कंपनीकडून स्पष्टीकरण नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss