spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

The Kashmir Files ‘खोटं किती उंच झालं तरी….’ अनुपम खेर यांचं सुचक वक्तव्य

गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival of India) सोमवारी सांगता झाली. ज्युरीने 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं, त्यानंतर या समारंभात एकच गोंधळ उडाला.

The Kashmir Files in IFFI : गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival of India) सोमवारी सांगता झाली. ज्युरीने ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं, त्यानंतर या समारंभात एकच गोंधळ उडाला. इस्त्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी सांगितले की, महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आल्याने ते नाराज झाले आहेत. तसेच त्यांनी या चित्रपटाला ‘प्रपोगंडा आणि वल्गर’ म्हटलंय. नदाव लॅपिड यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आता चित्रपटाच्या कलाकार आणि निर्मात्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

हे ही वाचा : ‘The Kashmir Files’ प्रोपगेंडा फिल्म, IFFIच्या ज्युरींचं मत

अनुपम खेर यांनी ट्विट करत म्हटले…

काश्मीर फाईल्समध्ये महत्वाची भूमिका साकारलेल्या अनुपम खेर यांनी लॅपिड यांना चांगलेच सुनावले आहे. अनुपम खेर यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ हा प्रपोगंडा आणि वल्गर असल्याच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत लिहिले की, ‘खोट्याची उंची कितीही मोठी असली, तरी सत्याच्या तुलनेत ती नेहमीच लहान असते.’ अनुपम खेर यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ मधील त्यांचा फोटो ट्विटमध्ये शेअर केला आहे. खेर यांच्या या ट्विटला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तसेच अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ देखील शेअर करत स्वतःचे मत त्यामध्ये मांडले आहे.

 सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आता व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. काहींनी लॅपिड हे कोण आहेत याविषयीचा शोध घेतला आहे. बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपटानं गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वेगळ्या वातावरणाची निर्मिती केली. केवळ सोशल मीडियावरील मार्केटींग स्टॅट्रजीनं प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यास प्रवृत्त केले. असे ज्या चित्रपटाच्याबाबत म्हटले जाते त्या द काश्मिर फाईल्स या चित्रपटावरील वाद अजुनही थांबलेले नाहीत.

चित्रपटातील अभिनेता दर्शन कुमारने एका खासगी वृत्तपत्रासोबत केलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘प्रत्येक जण जे पाहतात आणि ऐकतात, त्यावर त्यांचे स्व:ताचे एक मत असते, परंतु द काश्मीर फाइल्स हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या समुदायावर आधारित आहे. हे सत्य नाकारता येणार नाही. कुमार म्हणाला, ‘हा चित्रपट सत्यावर आधारित आहे.’

काय म्हणाले नदाव लॅपिड?

चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक गोव्यात पोहोचले होते. दरम्यान, इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर आणि या चित्रपटाच्या इफ्फीमधील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. इफ्फीच्या ज्युरीचे अध्यक्ष इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड म्हणाले की, ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने आम्हा सर्वांना व्यथित केले आणि आम्हाला प्रचंड धक्का बसला. अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक आणि स्पर्धात्मक विभागासाठी हा चित्रपट अतिशय अयोग्य वाटला. माझ्या या चित्रपटाविषयी असणाऱ्या भावना मी उघडपणे मांडतोय. कारण इतक्या प्रतिष्ठित महोत्सवात अशा प्रकारच्या कठोर टीका या व्हायलाच हव्यात..!’ असंही ते म्हणाले.

हे ही वाचा :

शिंदे गटातील नेत्यानं उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान, हिंमत असेल तर

RAJ THACKERAY पाच वर्षानंतर राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss