spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवर अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध प्रश्नांवर आपसात चांगलेच भिडले आहेत. शेतकऱ्यांना (Farmers) पीकं वाचवण्यासाठी सध्या विजेची गरज आहे. पण जबरदस्तीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. त्यामुळेचं काल पोपट जाधव या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचे दानवे म्हणाले. हे सरकार शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत आहे. शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा (Crop Insurance) मिळत नाहीत. विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खात असल्याचे दानवे म्हणाले. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अंबादास दानवेंनी यावेळी दिला. दानवेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंनी विविध मुद्यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत असल्याचा आरोप यावेळी दानवेंनी केला. सध्या शेतीसाठी शेतकऱ्यांना विजेची गरज आहे. अशा स्थितीत जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी सुरु असल्याचे दानवे म्हणाले. गोवरचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारकडून कोणतेही प्रतिबंधात्मक उपाय केले जाात नाहीत. सरकारच्या निष्काळीपणामुळं लहान मुलांचे मृत्यू होत असल्याचे दानवे म्हणाले. सर्वसामान्यांकडे या सरकारचे लक्ष नाही. कोणी देवीला जातय, तर कोणी प्रचाराला असा टोलाही दानवेंनी यावेळी शिंदे गटाला लगावला.

गोरेगाव येथे नेसको मैदानात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेच्या संदर्भात देखील दानवेंना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले. यावेळी दानवे म्हणाले की, मनसे फक्त घोषणा करते, बाकी काही करत नाही. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नी केंद्र सरकारशी चर्चा करुन प्रश्न सोडवायला हवा. आपला भाग महाराष्ट्रात आणायला हवा असेही दानवे म्हणाले. मराठी माणूस आणि शिवसेना घुसखोरांना त्यांच्याच कृतीतून उत्तर देईल असा इशाराही दानवेंनी यावेळी दिला.

हे ही वाचा : 

विनायक राऊतांनी साधला राज ठाकरेंवर निशाणा

Champa Shashthi 2022 : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, जाणून घ्या मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठीचे महत्त्व

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss