spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

काश्मीर फाइल्सला विरोध करणाऱ्या नदाव लॅपिडचं जितेंद्र आव्हाडांकडून समर्थन

जेव्हा काश्मीर फाइल्स (Kashmir Files) चित्रपट लोकांच्या भेटीला आला होता त्यावेळी पासूनच तो मोठा चर्चेचा विषय विषय बनला आहे. सध्या सोशल मीडियावर (social media) काश्मीर फाईल्सच्या नावाचा ट्रेंड सुरु झाला आहे. गोव्यातील इफ्फीमध्ये नदाव लॅपिड (Nadav Lapid) नावाच्या परिक्षकानं या चित्रपटावर केलेली कमेंट आता चर्चेत आली आहे. जितेंद्र आव्हांडापूर्वी (Jitendra Awhada) शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील काश्मीर फाईल्स हा भाजपचा (BJP) चित्रपट असल्याची थेट टीका केली होती.

 इस्त्राईलच्या प्रसिद्ध दिग्दर्शक नदावनं दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. काश्मीर फाईल्स हा एक अश्लील आणि प्रोपगंडा करणारा चित्रपट आहे. तो या महोत्सवामध्ये कसा आला याचे मला आश्चर्य वाटते. असे नदावनं म्हटले होते. त्यावरुन आता मनोरंजन विश्वात खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे. यासगळ्यात राजकीय, मनोरंजन विश्वातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे नदावच्यावतीनं त्यांच्या राजदुतानं माफी मागितली असली तरी भारतात मात्र हे प्रकरण अद्याप चर्चेत आहे.

काश्मीर फाईल्स हा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सतत चर्चेत असतो. हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. गोव्यातील इफ्फीच्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तो इस्रायली असल्याने मुस्लिम विरोधी “काश्मीर फाईल्स” चालवून घेईल अशी सरकारची अपेक्षा होती. पण “प्रचारकी आणि गलिच्छ” चित्रपट म्हणून मुख्य परीक्षक नदाव लापिडने सणसणीत चपराक लगावली. त्यांच्या या ट्विटला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यावरुन त्यांना देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा : 

The Kashmir Files ‘खोटं किती उंच झालं तरी….’ अनुपम खेर यांचं सुचक वक्तव्य

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवर अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss