spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Nadav Lapid काश्मीर फाईल्सला ‘अश्लील’ म्हणणारे ‘नदाव लॅपिड’ आहे कोण?

जगातील तमाम चित्रपट रसिकांसाठी मोठी पर्वणी असणाऱ्या इफ्फी चित्रपट महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत असतो. यावेळी देखील या महोत्सवानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जगातील तमाम चित्रपट रसिकांसाठी मोठी पर्वणी असणाऱ्या इफ्फी चित्रपट महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळत असतो. यावेळी देखील या महोत्सवानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये जगभरातील वेगवेगळे चित्रपट रसिक, अभ्यासक, दिग्दर्शक,निर्माते सहभागी होतात. यंदाचा महोत्सव मोठ्या आनंदात पार पडला. मात्र शेवटच्या दिवशी त्या सोहळ्याला एक गालबोट लागल्याचे दिसून आले.

हे ही वाचा : ‘The Kashmir Files’ प्रोपगेंडा फिल्म, IFFIच्या ज्युरींचं मत

गोव्यात आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (iffi) द कश्मीर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चित्रपट निर्माते नदाव लॅपिड (Nadav Lapid) हे चर्चेत आहेत. इफ्फीमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आल्याने नदाव लॅपिड हे नाराज आणि आश्चर्यचकित झाले. नदाव लॅपिड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रोपोगंडा आणि वल्गर आहे’ असं नदाव लॅपिड हे व्हायरल व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. नदाव लॅपिड यांची ती टीका आता दिग्दर्शक, निर्माते आणि काश्मीर फाईल्सच्या प्रेक्षकांच्या जिव्हारी लागली आहे. त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळे वाद सुरु झाले आहेत. ज्या ज्युरीनं ही प्रतिक्रिया दिली आहे त्याला शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. भारतातील सामाजिक, राजकीय परिस्थिती याविषयी त्या दिग्दर्शकाला काय माहिती असा प्रश्नही सोशल मीडियावरुन उपस्थित केला जातोय. जाणून घेऊयात सध्या चर्चेत असणाऱ्या नदाव लॅपिड यांच्याबद्दल…

नदाव लॅपिड कोण आहेत?

इस्राईलमधील तेल अवीवमध्ये जन्म झालेल्या नदाव लॅपिड त्यांच्या सिनोनिम्स नावाच्या चित्रपटामुळे ओळखले जातात. नदाव लॅपिड हे पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. नदाव लॅपिड यांचा जन्म १९७५ मध्ये इस्राइलमध्ये झाला. त्यांनी तेल अवीव विद्यापीठातून तत्त्वज्ञानाची पदवी घेतल आहे. नदाव लॅपिड यांनी काही काळ लष्करामध्ये देखील काम केले. त्यानंतर जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमध्ये पदवी घेण्यासाठी ते इस्राइलला परतले.

सिनोनिम्स (२०१९), द किंडरगार्डन टीचर (२०१४) आणि पुलीसमॅन (२०११) या चित्रपटांमुळे नदाव लॅपिड यांना विशेष लोकप्रियता मिळाली. यापैकी नदाव लॅपिड यांना द किंडरगार्डन टीचर आणि पुलीसमॅन या चित्रपटांसाठी गोल्डन बेअर आणि कान्स ज्युरी पारितोषिकही मिळाले आहे. २०१५ लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये नदाव लॅपिड हे गोल्डन लेपर्ड ज्युरीचे सदस्य होते. २००५ मधील रोड या शॉर्ट फिल्मची निर्मिती देखील त्यांनी केली. तर २०२१ मध्ये झालेल्या ७१ व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल महोत्सवातही त्यांनी ऑफिशियल कॉ़म्पिटिशन ज्युरीची भूमिका पार पाडली होती. ४७ वर्षीय नदाव लॅपिड हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

 

हे ही वाचा :

The Kashmir Files ‘खोटं किती उंच झालं तरी….’ अनुपम खेर यांचं सुचक वक्तव्य

काश्मीर फाइल्सला विरोध करणाऱ्या नदाव लॅपिडचं जितेंद्र आव्हाडांकडून समर्थन

Sanjay Raut on Kashmir Files ‘काश्मीर फाईल्स भाजपचाच चित्रपट’, राऊत बोललेच!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss