spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Police Bharti 2022 मोठी बातमी! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर

राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना (Maharashtra Police Recruitment 2022) राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. मागील काही दिवसांपासून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढवण्यासाठीची मागणी करण्यात येत होती.

 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, पोलीस भरती बाबत आमच्याकडे ११ लाख ८० लाख अर्ज आले आहेत. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पोलीस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवण्यात आली असल्याचा निर्णय झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. पोलीस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना आलेल्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. मात्र, संबंधित वेबसाईट वारंवार हँग होत असल्याने इच्छुकांना अर्ज भरताना अनेक अडचणी जाणवत होत्या. राज्यातील काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी बराच तास लागत होता. अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप रजिस्ट्रेशन झाले नसून काही विद्यार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया देखील अडकली असल्याची तक्रार करण्यात येत होती.

हे ही वाचा:

Nadav Lapid काश्मीर फाईल्सला ‘अश्लील’ म्हणणारे ‘नदाव लॅपिड’ आहे कोण?

Google Pixel 7 लवकरच होणार वाजवी दरात उपलब्ध

काश्मीर फाइल्सला विरोध करणाऱ्या नदाव लॅपिडचं जितेंद्र आव्हाडांकडून समर्थन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss