spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गोरेगावच्या पूर्व आयटी पार्कमागील जंगल परिसरामध्ये भीषण आग

मुंबईतील गोरेगाव पूर्व आयटी पार्कमागील जंगल (Forest behind Goregaon East IT Park) परिसरामध्ये भीषण आग ( terrible fire) लागली. काल रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (fire brigade) ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग इतकी भीषण आहे की लांबूनही ही आग स्पष्टपणे दिसत होती. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु ही आग नेमकी कशी लागली? याबाबतचा तपास दिंडोशी पोलिस करत आहेत.

गोरेगावच्या पूर्व आयटी पार्कमागील जंगल परिसरामध्ये मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली . नागरी आपत्ती व्यवस्थापन (Civil Disaster Management) विभागाच्या म्हणण्यानुसार ही घटना रात्री १०. ०० च्या सुमारास घडली. आरे कॉलनीतील गवत सुकवण्यासाठी ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एक फायर इंजिन, दोन जंबो वॉटर टँकर (Two jumbo water tankers) आणि एक फायर बाईक (Fire bike) घटनास्थळी तैनात करण्यात आल्याचे नागरी अधिकाऱ्यांनी (By civil authorities) सांगितले . आतापर्यंत जखमी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक वॉर्ड स्तरावरील कर्मचाऱ्यांसह वन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.

भीषण आगीत शेकडो झाडं जळून खाक झाल्याची शक्यता आहे. ज्या जंगल परिसरामध्ये आग लागली तो परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कचा (Sanjay Gandhi National Park) एक भाग असल्याची माहिती आहे. या परिसरात बिबट्या, मोर, वानर, हरण (Leopard, Peacock, Monkey, Deer) असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आहेत. तसेच या परिसरातील आगीच्या घटनेमुळे या वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.

हे ही वाचा : 

नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Green tomatoes हिरवे टोमॅटो खाण्याचे जाणून घ्या फायदे

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss