spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

रविना टंडनने येणार ‘या’ कृत्यामुळे येणार अडचणीत

अभिनेत्री रवीना टंडन (Actress Raveena Tandon) सध्या एका व्हिडीओमुळे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रवीना नेहमीच सोशल मीडियावर (social media) सक्रिय असते. रवीना अनेकवेळा घरातील कर कधी भटकंतीचे व्हिडीओ शेअर करते. अशातच तिने नुकतचं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याच्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली (Stuck in controversy) आहे.

 रवीनाला अभिनयासोबत वाइल्डलाइफ फोटोग्राफीचीदेखील आवड आहे. ती अनेकदा जंगलसफरी करताना दिसून येते. यावेळी जंगलसफरीदरम्यान (jungle safari) ती नियमांचं उल्लंघन करत वाघाच्या अधिक जवळ जाताना दिसत आहे. रवीनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची जीप वाघाच्या (tiger) खूप जवळ जाऊन थांबताना दिसत आहे. तसेच फोटो काढताना कॅमेरा शटर्सचादेखील आवाज येत आहे. वाघदेखील तिच्याकडे पाहून डरकाळी फोडताना दिसत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर या घटनेप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे, असं वन उपविभागीय अधिकारी (Forest Sub-Divisional Officer) धीरज सिंह चौहान (Dheeraj Singh Chauhan) म्हणाले. २२ नोव्हेंबर रोजी रवीनाने सातपुडा व्याघ्र प्रकल्पाला (Satpura Tiger Reserve) भेट दिली होती. यावेळी तिची जीप वाघाच्या जवळ गेली होती. वाहन चालक आणि त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावून चौकशी केली जाईल, असं अधिकाऱ्याने सांगितलं.

रवीनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवासाचे फोटो शेअर केले आहेत. तिने वाघां काही फोटोदेखील शेअर केले आहेत. रवीनाने या महिन्याच्या सुरुवातीलाच एक ट्विट केले होते. तिच्या या ट्विटनंतर भोपाळ (Bhopal) येथील वन विहार राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी उद्यानातील वाघांच्या आवारात दगडफेक (stone throwing) करणाऱ्या काही अज्ञातांच्या विरोधात तपास सुरू केला आहे. अशातच रवीनाने स्वतःचा हा व्हिडीओ शेअर केल्याने ती आता अडचणीत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

DSLR देखील फेल होईल iPhone 15 पुढे, डिझाइनसह कमालीचे अपग्रेड पाहून ग्राहक खुश

Zombie virus शास्त्रज्ञांनी दिली चेतावणी, ४८ हजार वर्ष जुना ‘झोम्बी व्हायरस’ पुन्हा जिवंत

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss