spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई महानगर पालिकेत राज ठाकरेंचं वन मॅन शो !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर निघालेले आहेत. ते कोल्हापूरला जाणार आणि त्यानंतर तळ कोकणच्या दिशेनी निघणार आहेत. काल राज ठाकरे यांनी कोल्हापूर मध्ये पोहचल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची घोषणा केली ती म्हणजे मुंबई महानगर पालिकेत राज ठाकरे हे एकट्याने सामोरे जाणार आहेत. राज ठाकरे एकट्याने सामोरे जाणार आहेत का? त्यांना ते पेलणार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात यावर आज आपण या बातमीतून सविस्तर पाहणार आहोत.

मुंबई , ठाणे नवी मुंबई महानगर पालिका या सर्व जे मुंबईच्या आसपासच्या महापालिका आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस एकवटला आहे. जो चाकरमानी म्हणून मुंबईत आला आणि बघता-बघता त्यांनी सगळ्या महानगर पालिकेवर एक वेगळा प्रभाव पडला. या प्रभावामुळे शिवसेना अधिक सक्षम झाली. खरंतर सिधुदुर्ग हा सगळ्यात छोटा जिल्हा पण या सिधुदुर्ग मधून आलेला जो चाकरमानी आहे त्यांनी शिवसेनेला भरभरून दिलं. पण याच शिवसेनेनी कोकणी माणसाला देतांना हात आकडता घेतला. म्हणून आता राज ठाकरे यांनी आपला “एकला चालो रे” आवाज बुलंद केला आहे.

काल कोल्हापूरच्या अंबाईच दर्शन घेतल्यांनंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका म्हणजे ते कश्या पद्धतीने मुंबई महानगर पालिका एकट्याने जाणार आहेत ते स्पष्ट केलं. राज ठाकरे यांचा पक्ष बनल्या पासून त्यांनी सर्वाधिक काळ असणारी युती केली नाही. राज ठाकरे एकटे लढत राहिले त्यांनी अनेकांना अंगावर घेत राहिले. पण यात राज ठाकरेंनी मोठी गडबड केली ती म्हणजे वेळोवेळी आपली भूमिका बदलणे. कधी ते मोदींच्या माघे गेले तर कधी ते ठाकरेंच्या विरोधात उभे राहिले तर कधी काँग्रेसला धोपटलं देवेंद्र फडणवीस यांना धोपटलं यांच्या या सर्व धरसोड भूमिकेमुळे राज ठाकरे हे सारीपाटाच्या खेळामध्ये एकावर आले आहेत म्हणजेच एक आमदार आणि एक नरगरसेवक. पण तरीही राज ठाकरे यांना कोणीही दुर्लक्षित करूशकत नाही हि राज ठाकरेंची ताकत आहे. आणि तेच त्यांना कळून चुकलं आहे.

काही दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी झाल्या गटध्यक्षांच्या मेळाव्या मध्ये कार्यकर्यांना आपण काय करतोय याची विसर पडू नये हे उजळणी वर्ग होता असं काहींच म्हणणे आहे. पण याची महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले ते असं म्हणाले माझ्या विठ्ठलाला काही बडव्यांनी घेरलं आहे राज ठाकरे यांच्याकडे सुद्धा बडवे आहेत त्यांनी राज ठाकरेंना घेरलं आहे ते आपल्या सर्वांना माहित आहे. एकतरी राज ठाकरे यांची धरसोड वृत्ती दुसरी त्यांच्या अवतिभवती असलेली मित्रमंडळी आणि चांडाळचौकटी आणि तिसरं म्हणजे भाजप आणि शिवसेनेचा खूप मोठा रेटा आहे त्या रेट्या समोर जे महाराष्ट्र सैनिक आहेत ते तक धरून उभे आहेत त्याला तर सलामच केला पाहिजे. उत्पनाचा कुठलाही मार्ग नसतांना त्यांनी पक्षसाठी केलेलं जे काम आहे त्याला आपण कौतुकाची थाप मारली पाहिजे.

तर राज ठाकरे यांचे सर्वाधिक नगरसेवक जर कधी निवडून आले असतील तर ते म्हणजे २०१२ मध्ये. २०१२ मध्ये मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले. जेव्हा २००७, २०१२, २०१७ ची लढले आणि यासर्व निवडणूक लढतांना त्यांनी २०० हुन जास्त जागा लढवल्या. पण कधी सात नगरसेवक निवडून आले तर २७ आणि ७ निवडून आले तेव्हा ६ उद्धव ठाकरे यांनी पळून लावले एका रातोरात आणि आता फक्त एक नगरसेवक राहिला. पण आता आपण पाहिलं तर मनसे पदाधिकाऱ्यांना शाईतल्याची भूमिका वाढीला लागली आहे. कारण असं फक्त की एक आमदार आणि एक नगरसेवक आहे. त्यांनी लक्ष कितीचं ठेवलं आहे ते माहित नाही पण आता एका तासाने जरी निवडणूक लागली तरी एक अशी जागा आहे जी एक तासाने जरी निवडणूक घटली तरी जिंकून येईल तिचा वॉर्ड क्रमांक आहे ११४. हा ११४ मतदार संघ येतो भांडुपमध्ये. कधीकाळी तिथून शिशिर शिंदे आमदार होते थीतल्याज्या नगरसेवक आहे त्यांचं नाव आहे अनिशा माजगावकर पण त्यांचा मजच्या निवडणुकीत पराभव झाला ते फक्त १५०मतांनी. आता ज्या पद्धीतीने त्यांनी हा मतदार संघ बंदला आहे तो इतका जबरदस्त आहे कि जर येणार निवणुकीत नगरसेविका झाल्या नाहीत तर मतदारसंघामध्ये गडबड झाली आहे, मतदान यंत्रणेमध्ये गडबड झाली आहे किंवा त्यांना पडण्याची सुपारी पक्षातल्याच काही नेत्यांनी घेतली आहे इतकंच आपण म्हणू शकतो.

Zombie virus शास्त्रज्ञांनी दिली चेतावणी, ४८ हजार वर्ष जुना ‘झोम्बी व्हायरस’ पुन्हा जिवंत

येणाऱ्या काळात शिवसेनेची बढे ब्रँडेड मंडळी आपल्या मुला बाळांचे चांगभलं करण्याच्या नादात राज ठाकरे यांच्या हाती सत्ता अलगत सुपूर्त करून देणार आहेत इतकं आपण या घडीला सांगू शकतो. कारण सामान्य शिवसेनेमध्ये जो असंतोष आहे तो उद्धव ठाकरे समजून घेण्यासा तयार नाही आहेत. तो असंतोष समजून घेण्यासाठी वरून सरदेसाई, सुनील प्रभू, विनायक राऊत यांच्या सारख्या हो मध्ये हो मिळवणाऱ्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे एकटे जाणार असतील तर त्यांना भारतीय जनता पार्टी किंवा शिंदे शाही मदत करणार यावरच राज ठाकरे यांचा “एकला चालो रे” खेळ अवलंबून आहे. अन्यथा त्यांना मुंबई महानगर पालिकेच्या गॅलेरीतच बसून त्यांच्या मंडळींना मुंबई महानगर पालिकेचा कारभार बगवा लागेल.

हे ही वाचा : 

मुख्यमंत्र्यांना प्रतापगडावर जाण्याचा अधिकार नाही, संजय राऊत तापले

रविना टंडनने येणार ‘या’ कृत्यामुळे येणार अडचणीत

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss