spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शास्त्रज्ञांनी घोषित केलेला ४८,५०० वर्ष जुना ‘झोम्बी व्हायरस’ नेमका काय आहे ? पहा

आता पर्यंत तुम्ही ऐकलं असेल की शास्त्रज्ञांना जमिनीखाली कित्येक हजार वर्ष जुनी नाणी(ancient coins) , वस्तू , प्राचीन काळात असलेल्या प्राण्यांच्या अवयवांचे हाडे (ancient animal bones) , प्राचीन कालीन मुर्त्या (Ancient statues) अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत. आतापर्यंत तुम्ही कित्येक हजारो वर्ष जुनी डायनॉसॉरचे अवशेष चित्रपटांमध्ये पहिले असतील तसेच सद्याच्या आधुनिक चित्रपटांमध्ये तुम्ही झोम्बी व्हायरस पाहिलं असेल. पण आता तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसणार आहे की शास्त्रज्ञांना असा एक विषाणू (Virous )अस्तित्वतात असल्याचे सांगितले आहे. शास्त्रज्ञांनी सावध केले आहे की सायबेरियातील बर्फाखाली हा झोम्बी व्हायरस (Zombi)विषाणू ४८,५०० वर्षांपासून दडलेला आहे. आणि जागतिक तापमान (global warming) वाढीमुळे बर्फ विरघळत आहे आणि त्यामुळे या विषाणूंचे पुनरुज्जीवन होऊ शकते .

रशियातील सायबेरियन पर्माफ्रॉस्ट या ठिकाणी शास्त्रज्ञांना ४८,५०० वर्ष जुन्या झोम्बी (Zombi)विषाणूचा शोध लागला आहे. सायबेरियन पर्माफ्रॉस्ट हा भाग तेथील थंड वातारणामुळे कायम स्वरूपी बर्फाच्या चादरीखाली झाकलेला असतो.या भागाला पर्माफ्रॉस्ट असे म्हणतात कारण हा भाग कायमस्वरूपी गोठलेला असतो म्हणून या भागाला पर्माफ्रॉस्ट म्हणतात. पण गेल्या दोन दशकांपासूनच्या सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे जगभरात तापमान वाढत आहे ,या मुळे सायबेरियन पर्माफ्रॉस्ट हा भाग अपरिवर्तनीय पणे वितळण्यास सुरुवात झाली आहे .शास्त्रज्ञांना शोधातून असे आढळले की पर्माफ्रॉस्टच्या बर्फाखाली १३ धोकादायक प्राचीन सूक्ष्मजंतू दडलेले आहेत. आणि सतत हा भाग अपरिवर्तनीय पणे वितळत राहिला तर बर्फाखाली दडलेले हे जंतू पुनरुज्जीवित्त होऊन जगामध्ये परसण्याचा धोका असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी धोका निर्माण होऊ शकतो.

या संशोधकांना सापडलेल्या १३ प्राचीन सूक्ष्मजंतूपैकी सर्वात जुना ४८,५०० वर्षे तलावाखाली दडलेला अमिबा विषाणू शास्त्रज्ञांना सापडला होता.या जंतूला शास्त्रज्ञांनी “झोम्बी” विषाणू असे नाव दिले आहे. हा विषाणू संसर्ग जन्य आहे की नाही याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत . पण असाच एक आजार प्राण्यांमध्ये आढळतो ज्याला “झोम्बी डियर डिसीज असे म्हणतात. खरेतर या आजाराला क्रॉनिक वेस्टिंग डिसीज (Chronic Wasting Disease ) म्हणतात. या आजाराची लक्षणे अशी आहेत की जर हा आजार झाला तर हा रोग मेंदूला असा परिणाम करतो ज्यामुळे प्राणी सतत लाळ काढत राहतो आणि आळशीपणाने वागतो, प्राण्याची अगदी झोम्बी सारखी स्थिती होते.पण आजपर्यंत, मानवांमध्ये क्रॉनिक वेस्टिंग रोग, किंवा CWD चे कोणतेही प्रकरण आढळले नाहीत. तथापि, काही तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे की यामुळे लोकांना धोका होऊ शकतो.

त्यामुळे जर झोम्बी हा आजार माणसाला झाला तर याचे परिणाम प्राण्यांप्रमाणेच माणसावरही आढळू शकतात, सतत तोंडातून लाळ पडत राहणे आणि आळशीपणाने वागणे असे काही लक्षणे आढळू शकतात. सध्या शास्त्रज्ञ झोम्बी या विषाणुवर अभ्यास करत आहेत. पण त्याआधी शास्त्रज्ञानी याचा धोका मानवी जीवनाला धोका असल्याचे सांगितले आहे.

The Kashmir Files चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, तर दुसरीकडे अनुपम खेर सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनाला

Latest Posts

Don't Miss