spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Womens Health Tips बाळंतपणानंतर सुटलेले पोट कमी कसे करावे ?

After delivery belly fat : आई (Mother) होणे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाची गोष्ट आहे. एकदा गरोदर (pregnant) राहिल्यानंतर स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागते. खाण्या पिण्याची आणि आरोग्याची देखील काळजी घेतली पाहिजे. तसेच गर्भवती महिलांना कॅल्शियम, आणि पोषक तत्वे असलेले पदार्थ खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात. बऱ्याच वेळा बाळंतपणानंतर महिलांमध्ये पोटाची चरबी वाढतांना दिसते. तसेच पोटावर स्ट्रेच मार्क देखील येतात. बाळंतपणानंतर पोटाची चरबी वाढते ही समस्या अनेक महिलांना उद्भवते. पण काही महिलांना ही समस्या दीर्घकाळ असते. पोटावरील चरबी कमी कशा प्रकारे कमी करायची हा प्रश्न सर्व महिलांना पडतो ? तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून बाळंतपणानंतर सुटलेले पोट कमी कसे करायचे या बद्दल सांगणार आहोत.

दालचिनी (Cinnamon) आणि लवंग (cloves) हे मिश्रण दोन्ही एकत्र केल्यावर प्रसूतीनंतर पोटावरील चरबी आणि वजन कमी (weight loss) करण्यास मदत होते. गरम पाण्यात दालचिनी आणि लवंग चांगले उकळून घेणे. पाणी उकळल्यानंतर ते ग्लास मध्ये घ्या पण चांगले गाळून घ्या. पाणी थोडे कोमट होऊन द्या, आणि याचे या १ महिना तरी सेवन करा.

 

प्रसूतीनंतर पोटावरची चरबी वाढते ते कमी करण्यासाठी तुम्ही बदाम आणि मनुक्यांचा वापर करावा. जास्त प्रमाणात वजन वाढू नये म्हणून बीया असलेले मनुके घेणे. आणि मनुक्यांमधील बीया काढून टाकणे. तसेच या मनुक्यान सोबत बदाम देखील घेणे. हे मिश्रण गरम दुधासोबत सेवन करणे. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. तसेच तुम्ही व्यायाम देखील करू शकता. त्याचसोबत पाणी देखील जास्त प्रमाणात पिणे आणि वेळेवर आहार घेणे.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही ओव्याचे पाणी देखील सेवन करू शकतात. ओव्याचे पाणी बनवताना एका ग्लासमध्ये पाणी घेणे आणि त्या मध्ये ओवा घालून ओवा घातल्यानंतर पाणी चांगले उखळून घ्यावे आणि नंतर पाणी गाळून घेतल्यानंतर ते पाणी पिणे.

हे ही वाचा :

चॉकलेट केक बनवण्याची रेसिपी

 

 

Latest Posts

Don't Miss