spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Vijay Hazare Trophy सौराष्ट्रानं नाणेफेक जिंकलं, महाराष्ट्राची फलंदाजी सुरू

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम बी ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ३५० धावा करूनही महाराष्ट्राला आसामविरुद्ध विजयासाठी संघर्ष करावा (Vijay Hazare Trophy) लागला. आज शुक्रवार, २ डिसेंबर रोजी विजेतेपदाच्या लढतीत महाराष्ट्राची लढत सौराष्ट्रशी (SAUR vs MAH) सुरु झाला आहे. सौराष्ट्रानं नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. महाराष्ट्राचा संघानं पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिलीय. तर, सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय. या स्पर्धेत सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळालाय. तर, महाराष्ट्राच्या फलंदाजांनी विरोधी संघातील गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणलंय.

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांचा कर्णधार रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आधीच उपांत्यपूर्व फेरीत दुहेरी शतक आणि पुढील संम्यात एक शतक झळकावणारा अशी सर्वाना आशा आहे. गायकवाड सध्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. गोलंदाजांमध्ये तरुण राजवर्धन हंगरगेकर हा खेळाडू आहे. त्याने उपांत्य फेरीत चार विकेट्स घेतल्या आणि उत्तर प्रदेशविरुद्ध फायफर(Vijay Hazare Trophy 2022 Final) पूर्ण केले.

हेही वाचा : 

राज्यात गोवर रुग्णांच्या प्रादुर्भावात झपाट्याने वाढ, औरंगाबादमध्ये 7 नवे रुग्ण, तर संशयितांचा आकडा ८० वर

सौराष्ट्रसाठी, कर्णधार जयदेव उनाडकट(Jaydev Unadkat) या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वाची भूमिका बजावेल, ज्याने आतापर्यंत १९ खेळाडूंना बाद केलं आहे. शेल्डन जॅक्सन आणि चेतन साकारिया यांसारख्या इतर मोठ्या नावांचाही या संघात अभिमान आहे. फलंदाज समर्थ व्यास हा संघासाठी आणखी एक सातत्यपूर्ण कामगिरी करणारा आहे.

महाराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सत्यजीत बच्छाव, अंकित बावणे, अजीम काझी, राजवर्धन हंगरगेकर, शमशुजामा काझी, सौरभ नवले (विकेटकिपर), मनोज इंगळे, मुकेश चौधरी, पवन शहा, नौशाद शेख

कर्नाटक सरकारने महाराष्ट्राला डिवचल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेनी केली ‘ही’ मोठी घोषणा

सौराष्ट्राची प्लेईंग इलेव्हन

हार्विक देसाई (विकेटकिपर), शेल्डन जॅक्सन, जय गोहिल, समर्थ व्यास, प्रेरक मंकड, अर्पित वसावडा, चिराग जानी, धर्मेंद्रसिंह जडेजा, जयदेव उनाडकट (कर्णधार), कुशांग पटेल, पार्थ भुत

Latest Posts

Don't Miss