spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गांधीनगर-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची पुन्हा एकदा गुरांवर धडक

मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान धावणारी ‘वंदे भारत एक्सप्रेस’ (Vande Bharat Express) पुन्हा एकदा अपघाताची शिकार झाली आहे. वलसाड ते वापी दरम्यान गुरुवारी संध्याकाळी सेमी हायस्पीड ट्रेन गुरांना धडकली. या अपघातात ट्रेनच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे. वापी ते उदवाडा दरम्यान रेल्वे १२ मिनिटे थांबली. यावर्षी ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी (Prime Minister Narendra Modi) या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. ३० सप्टेंबरपासून या मार्गावर वंदे भारत ट्रेन सेवा सुरू झाल्यापासूनची ही चौथी घटना आहे. यापूर्वी २९ ऑक्टोबर रोजी या ट्रेनला अपघात झाला होता.७ ऑक्टोबर रोजी वंदे भारत एक्स्प्रेसचीही एका गायीला धडक बसली होती. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची गुरांना धडक देण्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.

हेही वाचा : 

Vijay Hazare Trophy सौराष्ट्रानं नाणेफेक जिंकलं, महाराष्ट्राची फलंदाजी सुरू

सातत्याने वाढणारी समस्या

वंदे भारत गाडी गुरांना धडकण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दोन महिन्यांत चार वेळा जनावरांच्या धडकेने रेल्वेच्या कामकाजावर परिणाम होतो, तर प्रवाशांनाही विलंबाचा सामना करावा लागतो. मोकळ्या ट्रॅकमुळे अनेकदा गुरे रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव वेगाने येणाऱ्या वंदे भारत गाडीला धडकतात.

Latest Posts

Don't Miss