spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यपालांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (भगतसिंग कोश्यारी) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपमानास्पद वक्तव्य करत आहेत. या वक्तव्यांमुळेच आता कोश्यारींची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरत आहे. यासाठीच आज पुण्यात (Pune) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) आंदोलन करण्यात आलं. पुण्यात आज राज्यपाल दौऱ्यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) प्रतिमा हातात घेऊन शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.

आज राज्यपाल कोश्यारी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राज्यपालांचा ताफा रस्त्यावरुन जात असताना राष्ट्रावादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांचा निषेध म्हणून त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली. तर काहींनी हातात काळे झेंडे (black flags) घेऊन राज्यपाल हटाव अशा घोषणा दिल्या. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान आम्ही सहन करणार नाहीत, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

पुण्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठात (Savitribai Phule University) आज राज्यपालांचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. मात्र युवक काँग्रेसच्या (Youth Congress) पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्यांचा जोरदार निषेध केला. युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. राज भवनच्या बाहेर राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्यात आले. राज्यपाल नव्हे तर भाजपाल असून त्यांनी छत्रपती शिवजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून आम्ही आंदोलन केलंय. शिवाय संभाजीमहाराज छत्रपती (Sambhaji Maharaj Chhatrapati) यांच्या स्वराज्य संघटनेनेही राज्यपालांना काळे झेंडे दाखवत पुण्यात निषेध व्यक्त केला.

हे ही वाचा : 

‘दिवार’मध्ये अमिताभच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ जसं गोंदलं होतं तसं, संजय राऊतांचा हल्लबोल

मनसेचे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंना प्रतिउत्तर

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss