spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Akshaya Hardeek Wedding सर्वांची लाडकी जोडी, राणादा आणि पाठक बाई अडकले लग्नबंधनात

'तुझ्यात जीव रंगला'फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) कधी एकदा लग्नगाठ बांधणार यांची उत्सुकता सर्वांना लागली होती.

Akshaya Hardeek Wedding : ‘तुझ्यात जीव रंगला’फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Deodhar) कधी एकदा लग्नगाठ बांधणार यांची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर तो दिवस उगवला आहे. आज दि २ डिसेंबर रोजी हार्दिक आणि अक्षया विवाह बंधनात अकडले आहेत. नुकताच त्यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

 हार्दिक आणि अक्षया ही दोन्ही कलाकार आपल्या भेटीला आले ते झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून. कोल्हापूरच्या मातीत रंगलेल्या या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकलीच. शिवाय मालिकेतील प्रमुख कलाकार हार्दिक आणि अक्षया यांच्यावरही भरभरून प्रेम केलं. हार्दिक या मालिकेत राणादादा तर अक्षया अंजली पाठक बाईंच्या भूमिकेत होत्या. त्यांची ही जोडी हिट ठरली. आजही या दोघांना कुणी हार्दिक आणि अक्षया म्हणून फारसं ओळखत नाहीत तर ‘राणादा आणि पाठक बाई’ म्हणूनच त्यांची ख्याती आहे. असे प्रेक्षकांचे लाडके राणादा आणि पाठक बाई आज खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जीवनसाथी झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेदरम्यान राणादा आणि पाठकबाई ५ वर्ष एकमेकांसोबत काम करत होते. त्यादरम्यान त्यांची मैत्री झाली. एका कार्यक्रमादरम्यान हार्दिक म्हणाला,”माझ्या डोक्यात असा कधी विचार नव्हता पण माझी आई सारखी तिला विचारायची हे मला नंतर कळलं. आई तिला सांगायची की मला तू आवडतेस. मला आई म्हणालेली की आता मालिका संपलेय, मग तू दुसरी कोणती तरी मालिका घेशील, चित्रपट करशील, त्यामुळे आता घरात आहेस तर लग्नाचा विचार आधी कर. तुझं वय निघत चाललं आहे”. हार्दिक पुढे म्हणाला,”माझी आई मला म्हणाली की, ‘तू तिच्याशी बोलून बघ, मी आधी एकदा तिला विचारलं आहे. मी तिला म्हटलं की ती जेवढं माझ्याशी बोलते ना तेही बंद करेल. तरी ती म्हणाली की एकदा बोलून बघ. मी माझ्या आयुष्यात सर्व गोष्टी आईसाठी करतो. त्यामुळे मी ठरवलं की एकदा बोलून बघूया. तेव्हा मी अक्षयाशी बोललो की माझ्या आईची इच्छा आहे आपल्या दोघांचं लग्न व्हावं. तेव्हा ती म्हणाली की मला काही समस्या नाही, फक्त तू एकदा घरी येऊन बोल.’

नऊवारी साडी, हिरवा चुडा, साजश्रृंगार असा पाठकबाईंचा नववधू साज आहे. तर नवरदेव असणाऱ्या राणादानेदेखील कोल्हापूरी पेहराव केला आहे. अक्षयाने तिच्या मेहंदीत सप्तपदीची डिझाइन काढली आहे. दोघांनी पारंपरिक पद्धतीच्या मुंडावळ्या बांधल्या आहेत. अक्षया व हार्दिकचा हा लूक चाहत्यांच्याही विशेष पसंतीस पडत आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Ramchandra Naik (@amolnaik.cool)

 अक्षया-हार्दिकने ३ मे २०२२ रोजी साखरपुड्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. तेव्हापासून चाहते त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांचेही केळवण, मेहंदी, संगीत आणि हदळीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. एकमेकांशी असलेलं स्पेशल नातं सोशल मीडियावर जगजाहीर केल्यापासून हार्दिक आणि अक्षया एकमेकांसोबत बराच वेळ एकत्र घालवताना दिसत असतात. तसंच ते एकमेकांसोबत घालवलेले काही खास क्षण सोशल मीडियावर सुद्धा शेअर करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

 मध्यंतरी त्यांचे केळवण झाल्याचेही फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघांच्या कुटुंबाने मिळून नाशिक येवला येथे साड्यांची खरेदी केली. यावेळी अक्षयाची साडी विणतानाचे फोटोही व्हायरल झाले होते. तसेच त्यांची लग्नपत्रिका आणि त्यावर चांदीचे पान याचीही चर्चा झाली होती. पण ही तारीख कोणती असेल याबाबत मात्र गुप्तता पाळली होती. आज मात्र लग्नाच्या व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाली.

हे ही वाचा : 

Akshaya Hardeek Wedding : आता हार्दिक अक्षयाला रोज म्हणणार “चालतंय की”… पहा #अहा वेडिंग फोटो

Google Doodle Today आज गूगलचं खास डूडल, जगातील पहिले व्हिडीओ गेम कन्सोल बनवणाऱ्या गेराल्ड जॅरी लॉसन यांची जयंती

Bigg Boss 16 निमृत कौरच्या मानसिक आजाराची खिल्ली उडवल्याबद्दल शालीन भानोतवर करणार खटला दाखल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss