spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तिरंगा उलटा पकडत नोरा फतेहीने केला राष्ट्रध्वजाचा अपमान

बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगणा नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात नोरा फतेहीचा धमाकेदार डान्स आणि ग्लॅमरस लूकची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

Nora Fatehi : बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगणा नोरा फतेही (Nora Fatehi) सध्या चर्चेत आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात नोरा फतेहीचा धमाकेदार डान्स आणि ग्लॅमरस लूकची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. नोराच्या या प्रसिद्धीमुळेच तिला कतारमध्ये फीफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. फिफा वर्ल्ड कप २०२२ (FIFA World Cup 2022) च्या फॅन फेस्टिव्हलमध्ये नोरानं जबरदस्त डान्स केला. नोरानं स्टेजवर भारताचा तिरंगा फडकवत जोरदार जय हिंदच्या घोषणा देखील दिल्या. पण या दरम्यान नोरानं एक घोडचूक केली,ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arshin k madhu (@arshin_k_madhu)

 नोरा सध्या कतारमध्ये आहे. ‘फिफा विश्वचषक २०२२’ दरम्यान नृत्य सादरीकरणाचे नोराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान नोराच्या एका चुकीने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. नृत्य सादरीकरणानंतर नोराने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. ‘जय हिंद’च्या घोषणा देताना नोराकडून एक चूक झाली. या एका चुकीमुळे नोरावर प्रचंड टीका होत आहे. ‘लाइट द स्काई अँथम’वर थिरकल्यानंतर नोराने तिरंगा फडकवला. या व्हिडीओमध्ये नोराने उत्साहाच्या भरात तिरंगा उलटा पकडलेला दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला चांगलचं ट्रोल केलं जात आहे. नोराने तिरंगा चुकीच्या पद्धतीने उचललेला व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर तिने तिरंगा एका व्यक्तीच्या दिशेने फेकला आहे. नोराने राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. एकीकडे ‘जय हिंद’च्या घोषणा देणारी नोरा दुसरीकडे मात्र राष्ट्रध्वजाचा चुकीच्या पद्धतीने वापर करताना पाहून तिचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.

व्हिडीओमध्ये नोरा फतेही बोलताना दिसतेय की,भारत भले फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला नसेल पण मी एक भारतीय म्हणूनच या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे,आपल्या भारतीय संगीताच्या आणि नृत्याच्या माध्यमातून. नोराचं हे बोलणं ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांमध्येच उत्साह संचारला. नोरासोबत उपस्थित प्रेक्षकही जय हिंदच्या घोषणा देऊ लागले. संपूर्ण स्टेडियम भारत आणि भारताविषयीच्या सुरु असलेल्या जय हिंदच्या घोषणांनी दणाणून गेला. नोरा भारतीय तिरंगा हातात घेऊन फडकवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला खरं. पण…

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केलं आहे. एकानं लिहिलं आहे की, ‘तिरंग्याला चुकीचं पकडलं आहे’. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की,’तिरंग्याला ज्या पद्धतीनं तिला दिलं ते खूप अपमानास्पद होतं’. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,’नोरानं तिरंग्याचा मान राखला नाही.तिनं त्याचा अपमान केला’. नेटकऱ्यांच्या मते नोराला तिरंगा पकडायचा कसा,फडकवायचा कसा हे देखील माहित नाही. हे खूपच अपमानास्पद आहे. नोराच्या या हरकतीमुळे तिचे चाहते देखील तिच्यावर नाराज झालेले दिसत आहेत. अद्याप नोरानं या ट्रोलिंगवर काहीही उत्तर दिलेलं नाही.

नोरा अभिनेत्री असण्यासोबत नोरा एक उत्तम मॉडेल आणि नृत्यांगना आहे. ‘रोर: टायगर्स ऑफ द सुंदरबन’ या सिनेमाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘दिलबर’ या गाण्याने तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती एका पेक्षा एक सिनेमांत डान्स करताना दिसून आली.

हे ही वाचा : 

राज्यपालांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

‘दिवार’मध्ये अमिताभच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’ जसं गोंदलं होतं तसं, संजय राऊतांचा हल्लबोल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss