spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Jubin Nautiyal गायक जुबिन नौटियालने दिली त्यांच्या आरोग्यबद्दल अपडेट, म्हणाला देवाने वाचवले

लोकप्रिय गायक जुबीन नौटियाल (Jubin Nautiyal) यांच्याबाबत गुरुवारी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. तसेच जुबिन नौटियाल सध्या चर्चेत आहे.

लोकप्रिय गायक जुबीन नौटियाल (Jubin Nautiyal) यांच्याबाबत गुरुवारी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. तसेच जुबिन नौटियाल सध्या चर्चेत आहे. जिन्यांवरुन खाली पडल्याने जुबिन गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता प्रकृतीत सुधारणा होत असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. जुबिनने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रकृतीसंदर्भात माहिती दिली आहे.

जुबिन नौटियाल हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय गायक आहे. नुकतच त्याचं ‘तू सामने आये’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. जुबिनची ‘लूट गये ते हमनवा मेरे’, ‘रात लंबिया’, ‘गुठ्ठी मोहब्बत में’ अशी अनेक गाणी तरूणांमध्ये लोकप्रिय आहेत. तरुणांचा तो आवडता गायक आहे.

 जुबिनने रुग्णालयातील एक फोटो शेअर करत प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार. देव माझ्यावर लक्ष ठेवून होता. या गंभीर अपघातातून त्याने मला वाचवले. आता मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तुमचं प्रेम आणि प्रार्थनेबद्दल मनापासून आभार”. जुबिनच्या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटीदेखील त्याला काळजी घेण्याचा आणि आराम करण्याचा सल्ला देत आहेत. निती मोहनने लिहिलं आहे,”लवकर बरा हो, तुझ्यावर खूप प्रेम आहे”. रॅपर बादशाहने लिहिलं आहे,”भाऊ लवकर बरा हो”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jubin Nautiyal (@jubin_nautiyal)

 जुबिनचा अपघात कसा झाला?

जिन्यावरुन खाली उतरत असताना पाय सटकल्याने जुबिनचा अपघात झाला. या अपघातात जुबिन गंभीर जखमी झाला. त्याचा उजवा हात आणि डोक्याला दुखापत झाली. त्याच्या उजव्या हाताची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पायऱ्यांवरून खाली पडताना झुबिनची कोपर तुटली . एवढेच नाही तर या घटनेत त्याच्या डोक्याला, कपाळावर आणि बरगड्याला जखमा झाल्या आहेत. झुबिनला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो आपल्या गावी गेला आहे. तसेच सध्या डॉक्टरांनी झुबिनला उजवा हात न वापरण्यास सांगितले आहे.

हे ही वाचा : 

हिटलरने जगाला अनेक चांगल्या गोष्टी दिल्या, कान्ये वेस्टने केला दावा

संजय राऊतांनी सुनावले खडेबोल, सोलापुरात कर्नाटक भवन बांधणार असाल तर

Akshaya Hardeek Wedding राणादा पाठकबाईंचा रिसेप्शन सोहळ्याचे काही खास क्षण

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss