Datta Jayanti pooja : दत्त जयंती हि हिंदू धर्मात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. हिंदू धर्मात दत्त जयंतीला खूप महत्व आहे. या वेळी दत्त जयंती ही ७ डिसेंबर २०२२ रोजी बुधवारी साजरी करण्यात येणार आहे. दत्त भगवानला तीन चेहरे आणि सहा हात असतात. दत्त जयंतीनिमित्त विशेष पूजा केली जाते. तर आज आम्ही तुम्हाला या बातमी मधून दत्त जयंती निमित्त पूजा करण्याची पद्धत सांगणार आहोत.
दत्तात्रय हा शब्द दत्त व आत्रेय अशा शब्दांनी बनला आहे. दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्म असा होतो. आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा आहे. श्री दत्त भगवांच्या वेगवेगळया कथा प्रचलित आहे. मात्र सर्व कथांमध्ये दत्तात्रय श्री विष्णूचा अवतार आहे असे मानले जाते. अत्रीऋषीने पुत्रप्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्याच्या तपश्चर्याने सारे त्रीभूण पळून गेले होते. अत्रीऋषींच्या तपस्या करून ब्रह्मा विष्णु महेश हे तिन्ही देव प्रकट केली होते. आणि त्यांनी अत्रीऋषींना तपश्चर्याचे कारणे विचारले होते. अत्रीऋषींनी देवतांना विनंती केली की माझा पुत्ररूपाने जन्म घ्यावा. देवांनी त्यांची विनंती मान्य केली. ब्रह्मा विष्णु महेश या देवांच्या आशीर्वादाने दत्रात्रेय सोम दुर्वास असे तीन पुत्र आणि एक शुभात्रेयी नावाची कन्या अत्रीना प्राप्त झाली. दत्तात्रेय असाच एक अवतार आहे, ज्यांनी २४ गुरूंकडून शिक्षण घेतले. महाराज दत्तात्रेय आयुष्यभर ब्रह्मचारी, अवधूत आणि दिगंबर होते. भगवान दत्तात्रेयांच्या पूजेमध्ये अहंकार सोडून जीवनाला ज्ञानाने यशस्वी करण्याचा संदेश देण्यात आला आहे.
पूजा विधीची शुभ वेळ :
०७ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०८:०२ मिनिटांचा पूजा विधी करण्याचा वेळ आहे. आणि दत्तात्रेय जयंती समाप्ती ०८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ०९:३८ वाजेपर्यंत आहे.
भगवान दत्तात्रयची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम स्नान करून घेणे, आणि सुंदर कपडे परिधान करावे. त्यानंतर चौरंगावर लाल कपडा पसरवून घ्यावा आणि त्या चौरंगावर भगवान दत्तात्रेयांची मूर्ती ठेऊन द्यावी. नंतर चौरंगाच्या आजूबाजूला रांगोळी काढून घ्यावी आणि त्यांचा मूर्तीवर जल अर्पण करून घेणे. जल अर्पण झाल्यानंतर त्यांना चंदनाचा टिळा लावून घ्यावा आणि थोडे तांदूळ लावून घ्यावे. त्यानंतर मूर्ती समोर तुपाचा दिवा लावून घ्यावा. दिवा लावून झाल्यानंतर भगवान दत्तात्रेयान समोर त्यांची कथा वाचून घ्यावी आणि त्यांची आरती करून घ्यावी. आरती झाल्यावर त्यांचा समोर गोड शिरा म्हणून नेवैद्य दाखवावा.
हे ही वाचा: paneer benefits तुम्हाला पनीर खाण्याचे फायदे माहित आहेत का ?