spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अभिनेता आयुष्मान खुरानाच्या ‘अ‍ॅक्शन हिरो’ या चित्रपटाला पहिल्याच दिवशी निराशा

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana ) ‘अ‍ॅक्शन हिरो’ (Action Hero) हा चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पण आयुष्मान खुरानाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून काही चांगला प्रतिसाद मिळालेला नाही आहे. जसे की आपल्याला माहित आहे की बायकॉट बॉलीवूड (Boycott Bollywood) या ट्रेंडमुळे या वर्षी अनेक बॉलीवूड चित्रपटांना मोठा फटका पडला आहे. अ‍ॅक्शन हिरोसाठी हा पहिला दिवस निराशाजनक होता कारण १.३५ कोटी आले. अगदी कमी अपेक्षा असतानाही, २-३ कोटींची ओपनिंग होती. तथापि, दृश्यम २ (Drushyam 2) ची लाट सध्या इतकी मोठी आहे की जे काही समोर येत आहे ते सर्व वाहून जात आहे. म्हणजेच दृश्यम २ मध्ये अत्यंत लोकप्रिय चित्रपट ठरला आहे. त्यामुळे प्रेक्षक अन्य चित्रपट बघण्यापेक्षा दृश्यम २ बघण्यास पसंती करत आहेत.

अभिनेता आयुष्मान खुरानाची लोकप्रियता खूप आहे. तसेच अभिनेता आयुष्मान खुरानाचे सामूहिक योगदान खूप आहे. आयुष्मान खुराना हा अनंत सामाजिक संस्थांमध्ये मदत कार्याला कायम आघाडीवर असतो. तसंतर आपण समजू शकतो की, बायकॉट बॉलीवूड (Boycott Bollywood) या ट्रेंडमध्ये सगळेच बॉलीवूड कलाकार भरडले गेले आहेत. याच उदाहरण म्हणजे आयुष्मान खुरानाचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ या चित्रपटाचे पहिल्याच दिवशीचे अपयश. पण कदाचित आज आणि उद्याच्या दिवशीतरी वीकेंड असल्यामुळे आयुष्मान खुरानाचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ या चित्रपटाची चांगली कमाई होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. खरतर समस्या अशी आहे की चित्रपटाची पहिल्याच दिवशीची कमाई खूपच कमी आहे. आयुष्मान खुरानाचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ या चित्रपटाचे पहिल्या दिवशीचे कलेक्शन फोन भूत या चित्रपटापेक्षा कमी आहे पण नंतर वीकेंडला किमान काही संधी मिळण्यासाठी चांगला असायला हवा.

आयुष्मानच्या अंधाधुन, बधाई हो सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. तसेच आयुष्मानच्या बाला या चित्रपटला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयुष्मानचे आतापर्यंतचे चित्रपट हे विनोदासह भावना व्यापक चित्रपट होते. तसेच हे सर्व कौटुंबिक चित्रपट होते. तर आयुष्मानचा हा पहिला चित्रपट होता जो ऍक्शन चित्रपट आहे. कदाचित त्यामुळेच आयुष्मानच्या ‘अ‍ॅक्शन हिरो’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसेल. कारण प्रेक्षकांनी आतापर्यंत आयुष्मानला विनोदी आणि भावनात्मक पात्राची भूमिका साकारताना पाहिलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्या या अ‍ॅक्शन हिरो या पात्राला स्वीकारणे कठीण जात असेल.

हे ही वाचा :

पक्षाने जर आदेश दिला तर थेट कर्नाटकात जाईन, शहाजी बापू पाटील यांचं वक्तव्य

मोहमद शमीच्या जागेवर ‘या’ गोलंदाजाला मिळणार संधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss