spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Measles Disease गोवरचा राज्यात धुमाकूळ! आतापर्यंत १८ बालकांचा मृत्यू

Measles Disease : गोवर (Measles Disease) हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, शरीरावर लाल पुरळ येणे ही गोवरची मुख्य लक्षणे आहेत. यावर्षी २०२२ मध्ये गोवर उद्रेकाची संख्या जास्तच भितीदायक झाली आहे. २०२२ मध्ये गोवरचा उद्रेक ९३ पटींनी वाढला आहे.

या आजारावर अत्यंत प्रभावी अशी MR आणि MMR अशी लस गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. सर्व बालकांना या लसीचे दोन डोस देण्यात येतात. ९ महिने आणि १५ महिने वयोगटात या आजाराचे दोन डोस देण्यात येतात. त्याचबरोबर सेफ ड्रिकींग वॉटर, अजीवनसत्वाची मात्रा, सकस आहार, कुपोषण, कुपोषणावरील उपचार अशी उपाययोजना करून आपण ही साथ थांबवू शकतो. गोवर आजारात सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भीती असते.

राज्यातील गेल्या चार वर्षातील गोवरच्या रूग्णांची परिस्थिती पाहता यंदाची परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. २०१९ मध्ये गोवरचा उद्रेक 3 वेळा झाला. तर २०२० मध्ये ही संख्या २ वेळा झाला. अगदी मागच्या वर्षापर्यंत म्हणजेच २०२१ मध्ये गोवरचा उद्रेक केवळ एकदाच झालेला. मात्र, यावर्षी २०२२ मध्ये गोवर उद्रेकाची संख्या जास्तच भितीदायक झाली आहे. २०२२ मध्ये गोवरचा उद्रेक ९३ पटींनी वाढला आहे. यामध्ये १२,७६६ संशयित रूग्ण आहेत. तर मुंबईत १८ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. तर, तीन भिवंडी, दोन ठाणे मनपा, आणि एक वसई विरार शहरात झाला आहे.

हे ही वाचा : 

ठाकरे गटाच्या आणखी एका आमदाराला अँटी करप्शन ब्युरोची नोटीस

अब्दुल सत्तारांवर कार्यवाहीसाठी राज्यपालांनी पाठवलं मुख्यमंत्र्यांना निवेदन

Mumbai जमावबंदीबद्दल विश्वास नागरे पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss