spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जेलमध्ये डांबले तरी उद्धव ठाकरेंसोबत राहणार, एसीबीच्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया

राजकीय उलथापालथीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली असा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांनी केलाय. साळवींना उद्या एसीबी चौकशीला हजर राहण्याचं नोटीस पाठवण्यात आलीय. आपण जेलमध्ये गेलो तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहू. कोणीही किती काहीही म्हणाले जेलमध्ये गेलो तरी उद्धव ठाकरेंसोबतच (Uddhav Thackeray) राहू असं साळवी म्हणाले. दबावतंत्रामागे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

हेही वाचा : 

भाजपच्या प्रसाद लाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, ‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’

आमदार साळवी यांनी म्हटले की, राजकीय उलथापालथीनंतर मी निष्ठावंत राहिलो. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यामुळेच मला एसीबीची नोटीस आली आहे. यंत्रणाचा वापर करत नोटीस दिल्या जात असल्याचा आरोप साळवी यांनी केला. ज्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताचा आरोप ते भाजपमध्ये जात आहेत. मलादेखील तुम्हाला तुरुंगात डांबणार अशा धमक्या देण्यात आल्या असल्याचा दावा साळवी यांनी केला. आपण एसीबीच्या नोटिशीला घाबरत नसून चौकशीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. नोटीस पाठवण्याइतके माझ्याकडे कोणते घबाड आहे, हाच प्रश्न मला पडला असल्याचेही साळवी यांनी म्हटले.

मुख्यमंत्री शिंदे नागपुरात दाखल होण्यापूर्वीच, विमानतळावर कर्नाटकची माहिती देणारे पोस्टर

ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा डाव आखण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून (Maharashtra Politics) करण्यात येत आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात लाचलुचपत विभागाने (ACB) चौकशीची नोटीस काढण्यात आली. तसेच आता राजापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनाही एसीबीने चौकशी करण्यासाठी नोटीस जारी केली आहे. ही नोटीस साळवी यांना मिळाली आहे. राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनाच टार्गेट करण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

१५ दिवसांची मुदत द्या

मला १५ दिवसांची मुदत द्या अशी मागणी एसीबीकडे केली असल्याचे आमदार राजन साळवी यांनी म्हटले. आमदार साळवी यांना एसीबीने चौकशीसाठी अलिबाग येथे सोमवारी, ४ डिसेंबर रोजी बोलावले आहे. या दरम्यान, एसीबीने मला अटक केली तरी चालेल असेही त्यांनी म्हटले. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नसून मी मरेपर्यंत तुरुंगात राहीन, पण कुठही जाणार नाही, असेही साळवी यांनी म्हटले.

भगतसिंह कोश्यारी विरोधात, आजपासून ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ मोहीम

Latest Posts

Don't Miss