spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्र्यांसोबत केली समृद्धी महामार्गाची पाहणी

काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग( Samruddhi Mahamarg) बहुचर्चेचा विषय बनला होता. लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) समृद्धी महामार्गाची पाहणी करत आहेत. समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वी आज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर ते शिर्डी असा सोबत प्रवास करून समृद्धी महामार्गाची ट्रायल घेत आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत पाहणी करत आहेत.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून प्रवास करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्टेअरिंग सांभाळली आहे. दरम्यान राजकीय वर्तुळात चर्चा चालते की, मुख्यमंत्री जारी एकनाथ शिंदे असतील तरी सर्व निर्णय मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात. अशातच आता समृद्धी महामार्गावरील टेस्ट ड्राईव्ह दरम्यान गाडीची स्टेअरिंग देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे. यामुळे पुन्हा या चर्चा सुरू होऊ शकतात. हा प्रवास सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस कार चालवत आहेत. त्याचा आनंद वाटतो. हा वेगळा आनंद आहे आणि मोठा आनंद आहे. मीही कार चालवणार आहे. मी अगोदर ट्रायल घेतली आहे. १२०च्या स्पीडने आम्ही कार चालवणार आहोत. नियम पाळूनच कार चालवणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

येत्या ११ डिसेंबरला (On December 11) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण सोहळा (Inauguration ceremony) पार पडणार आहे. पण त्यापूर्वी ४ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर ते शिर्डी (Nagpur to Shirdi) असा सोबत प्रवास करून समृद्धी महामार्गाची ट्रायल घेत आहेत. हा महामार्ग खुला झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्याचा (Vidarbha-Marathwada) प्रचंड विकास झालेला पाहायला मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे ही वाचा : 

‘सामना’तील रोखठोक सदरातून संजय राऊतांनी सोडले टीकास्त्र, ४० आमदारांनी महाराष्ट्राच्या भूमीशी सरळ बेइमानी केली

नितीन गडकरींचं नाव घेत सुषमा अंधारेंनी केला गोपीनाथ मुंडेंविषयी मोठा गौप्यस्फोट

जेलमध्ये डांबले तरी उद्धव ठाकरेंसोबत राहणार, एसीबीच्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवींची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss